डायल 112 ते GPS ट्रॅकिंग: उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधांकडे दुर्लक्ष; देवेन भारतींचा दावा

मुंबई पोलिसांच्या विविध प्रकल्पांच्या लोकार्पणावेळी देवेन भारती यांनी २०१९ नंतर पोलिसांच्या सुविधा आणि तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष झाल्याचा मोठा दावा केला आहे.

Published On: 

Deven Bharati talking about Mumbai Police technology projects

प्रतिनिधी, 22 नोव्हेंबर: मुंबई पोलिसांच्या तंत्रज्ञान संवर्धित विविध प्रकल्पांचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना देवेन भारती (Deven Bharati) यांनी २०१९ नंतरच्या काळात पोलिसांच्या सुविधा आणि तंत्रज्ञानविषयक प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याचा दावा केला आहे.

भारती यांनी स्पष्ट केले की, २०१७ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रेरणेतून अनेक तंत्रज्ञान-आधारित प्रकल्प सुरू करण्यात आले होते. परंतु, २०१९ नंतर (उद्धव ठाकरे यांच्या काळात) या प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याने काही महत्त्वाचे प्रकल्प बंद पडले, तर काही योजनांसाठी पुन्हा जुन्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. त्यांनी ‘डायल ११२’ प्रकल्पाचे उदाहरण देताना सांगितले की, या अंतर्गत असलेली जीपीएसयुक्त वाहने आणि त्यांच्या लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंगची सुविधा त्या काळात थांबवण्यात आली होती.

२०२२ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर या सर्व प्रकल्पांना नव्याने गती मिळाली. यातून मुंबई पोलिसांचे अनेक प्रश्न सुटले असून, आज सादर करण्यात आलेले तंत्रज्ञान उपक्रम हे त्याच प्रयत्नांचे फळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

सध्या एमपीआयएएस (MPIAS) या डायनॅमिक आणि स्केलेबल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोलिसांचे सर्व प्रकल्प एकमेकांशी जोडले गेले आहेत. या प्रणालीमुळे कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढेल. तसेच, जनतेला सीमलेस सेवा मिळण्यासोबतच अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होऊन त्यांचे काम सुकर होईल, असा विश्वास देवेन भारती यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही