हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा सतावतोय? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फॉलो करा ‘हे’ रूटीन

हिवाळ्यातील कोरड्या हवेमुळे त्वचा निस्तेज आणि खरखरीत होते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत योग्य स्किन केअर रूटीन फॉलो केल्यास त्वचा मऊ राहण्यास मदत होते.

Published On: 

Winter skin care tips to avoid dry skin

प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: थंडीच्या दिवसांत वाहणाऱ्या कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे त्वचा निस्तेज, खरखरीत आणि कोरडी पडते. अनेकदा चेहरा, हात आणि पायांवर काळेपणा, पांढरे डाग किंवा ड्राय पॅचेस येतात. अशा वेळी दिवसभर केवळ मॉइश्चरायझर लावून हा कोरडेपणा जात नाही. त्यामुळे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक असते. रात्रीच्या वेळी योग्य पोषण मिळाल्यास सकाळी त्वचा अधिक मऊ आणि तजेलदार दिसण्यास मदत होते.

त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी ग्लिसरीन आणि गुलाबजलचा वापर फायदेशीर ठरतो. एका स्वच्छ बाटलीत निम्मे ग्लिसरीन आणि उरलेले गुलाबजल एकत्र करून हे मिश्रण रोज रात्री चेहरा, हात आणि पायांना लावावे. तसेच, मॉइश्चरायझेशनसाठी बदामाच्या तेलाचे काही थेंब घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्यास कोरडेपणा कमी होतो. याच्या नियमित वापराने त्वचा मऊ आणि चमकदार होऊ शकते.

हिवाळ्यात कडक गरम पाण्याने आंघोळ करण्याची अनेकांना आवड असते. मात्र, जास्त गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते आणि ड्राय पॅचेस दिसू लागतात. त्यामुळे चेहरा धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी नेहमी कोमट पाण्याचाच वापर करावा. तीव्र सुगंध असणारे आणि त्वचा जास्त कोरडी करणारे साबण वापरणे टाळावे. त्याऐवजी सौम्य क्लिन्झर किंवा मॉइश्चरायझिंग बॉडी वॉश वापरावा. आंघोळ झाल्यानंतर त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावल्यास ओलावा टिकून राहण्यास जास्त मदत होते.

मृत पेशी साचल्यामुळे चेहऱ्यावर येणारी निस्तेजता घालवण्यासाठी पिठाचा कोंडा आणि दही एकत्र करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट मान, चेहरा, हात आणि पायांवर हलक्या हाताने लावून काही वेळाने पाण्याने धुऊन टाकावी. ही पेस्ट लावताना त्वचा जोरात घासणे टाळावे. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे, त्यांनी हा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे गरजेचे आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही