प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: दुधावर घट्ट आणि जाड मलई आणण्यासाठी काही सोप्या घरगुती पद्धती अत्यंत उपयुक्त ठरतात. यासाठी सर्वप्रथम दीड ते दोन लिटर फुल क्रीम दूध घ्यावे. दूध गरम करण्यापूर्वी ज्या भांड्यात ते तापवायचे आहे, त्या भांड्याच्या कडांना थोडे तूप लावून घ्यावे. कडांना तूप लावल्यामुळे दूध उकळताना उतू जाण्याची शक्यता कमी होते आणि मलई व्यवस्थित जमण्यासही मदत मिळते.
दूध तापवायला ठेवताना त्यात अर्धा ग्लास पाणी मिसळावे आणि ते मंद आचेवरच गरम करावे. दूध उकळायला सुरुवात झाल्यानंतर त्यात सात ते आठ तांदळाचे दाणे टाकून ते हलवून घ्यावे. तांदळामध्ये असलेल्या स्टार्चमुळे मलईला चांगला घट्टपणा येण्यास मोठी मदत होते.
दूध पूर्णपणे उकळल्यानंतर त्यावर लगेच साधे झाकण न ठेवता जाळीदार झाकण ठेवावे. तसेच, दूध रूम टेम्परेचरला (सामान्य तापमानाला) येईपर्यंत ते अजिबात न हलवता तसेच ठेवून द्यावे. त्यानंतर दूध पूर्णपणे थंड झाल्यावर ते ५ ते ६ तासांसाठी किंवा रात्रभर फ्रिजमध्ये ठेवावे.
दुसऱ्या दिवशी सकाळी दुधावर जाड मलईचा थर जमा झालेला पाहायला मिळेल. ही मलई काढून तुम्ही घरच्या घरी सहजपणे तूप, लोणी आणि मावा तयार करण्यासाठी वापरू शकता.
📌 महत्वाच्या बातम्या
- न्यूझीलंडविरुद्ध १३६ धावांच्या खेळीनंतर दिनेश कार्तिककडून केएल राहुलचे कौतुक; दिग्गज सलामीवीरांच्या पंक्तीत दिले स्थान
- सलमान खानने मागितली श्रद्धा कपूरची जाहीर माफी; बॉक्स ऑफिसवरील क्लॅश ठरले कारण
- लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय संघर्ष; अमित देशमुख आणि भाजपच्या नवनाथ बन यांच्यात आरोप-प्रत्यारोप








