प्रतिनिधी, 21 नोव्हेंबर: अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच भाजप नेते नवनाथ बन यांनी एक मोठा दावा करत रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांचा अपघात ज्या विमानात झाला, त्याच विमानातून अजितदादा आणि रोहित पवार यांनी एकत्रित प्रवास केला होता, असा खळबळजनक आरोप बन यांनी केला आहे.
नवनाथ बन यांच्या म्हणण्यानुसार, १० डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली ते नागपूर असा हा एकत्रित प्रवास झाला होता. विशेष म्हणजे, या प्रवासादरम्यान व्हीएसआर कंपनीच्या या विमानाचे पायलट सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी हेच होते, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
रोहित पवार हे सातत्याने अजितदादांच्या अपघातावरून सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत. नुकतेच त्यांनी ‘मफलर मॅन’ असा उल्लेख करत, व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस मदत करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांना भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
एका पत्रकार परिषदेत बोलताना आपण व्हीएसआर कंपनीच्या विमानातून कधीही प्रवास केला नसल्याचे रोहित पवार म्हणाले होते. मात्र, रोहित पवार धांदात खोटे बोलत असून त्यांनी याच विमानातून प्रवास केल्याचा दावा करत नवनाथ बन यांनी हा नवा राजकीय बॉम्ब फोडला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गावरील दोन स्थानकांचे काम पूर्ण; डिसेंबरमध्ये प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता
- ड्रेसिंग रूमच्या बातम्या फोडल्याच्या आरोपांवर सरफराज खानचे मौन भंग; म्हणाला, ‘गौतम गंभीरने मला…’
- न्यूझीलंडमध्ये शुभमन गिलची ऐतिहासिक कामगिरी, कसोटीत अर्धशतक ठोकत एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी








