मोदी मंत्रिमंडळाचा २३ नोव्हेंबरला विस्तार होण्याची शक्यता; शमिक भट्टाचार्य यांच्यासह बड्या नेत्यांना संधीची चर्चा

मोदी मंत्रिमंडळाचा २३ नोव्हेंबर रोजी विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. यात पश्चिम बंगालचे शमिक भट्टाचार्य यांच्यासह महाराष्ट्रातील शिंदे गट आणि राष्ट्रवादीला संधी मिळू शकते.

Published On: 

PM Modi Gen Z university outreach plan

प्रतिनिधी, 20 नोव्हेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या २३ नोव्हेंबर रोजी होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता या खात्रीलायक माहितीमुळे बळ मिळाले आहे. अद्याप या विस्ताराची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, यावेळी काही बड्या नेत्यांना कॅबिनेटमध्ये संधी दिली जाणार असल्याचे समजते.

या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात पश्चिम बंगालला विशेष प्राधान्य दिले जाण्याची चिन्हे आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपची राजकीय ताकद अधिक भक्कम करण्यासाठी पक्षाचे राज्याध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शमिक भट्टाचार्य यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची आघाडीवर चर्चा आहे. सद्यस्थितीत पश्चिम बंगालमधून बालुरघाटचे लोकसभा खासदार सुकांत मजूमदार आणि बनगावचे खासदार शांतनू ठाकूर हे केंद्रात मंत्री आहेत. मजूमदार यांच्याकडे शिक्षण आणि ईशान्य क्षेत्र विकास राज्यमंत्रिपद, तर ठाकूर यांच्याकडे बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग या खात्याचे राज्यमंत्रिपद आहे.

राजधानी दिल्लीमध्ये वाढलेल्या राजकीय हालचालींमुळे विस्ताराच्या शक्यतेला दुजोरा मिळत आहे. नुकतीच पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यामध्ये विद्यमान मंत्र्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी रात्री पंतप्रधानांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन आणि भाजप नेते बी. एल. संतोष यांची प्रदीर्घ बैठक झाली. याशिवाय, गुरुवारी सुवेंदू अधिकारी यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली असून, आज भाजपच्या कोलकाता कोअर कमिटीचीही महत्त्वाची बैठक होत आहे.

पश्चिम बंगालव्यतिरिक्त इतर राज्यांनाही या विस्तारात प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यालाही मंत्रिपद येण्याची शक्यता आहे. यासोबतच बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांनाही नवीन मंत्रिपदे दिली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही