IRCTC वर कन्फर्म तात्काळ तिकीट हवेय? बुकिंगपूर्वी नक्की करा या ५ आवश्यक सेटिंग्स

रेल्वेचे कन्फर्म तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी आयआरसीटीसीवर तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वीच आधार ऑथेंटिकेशन आणि मास्टर लिस्टसह या ५ महत्त्वाच्या गोष्टी तयार ठेवा.

Published On: 

Tips and important settings for IRCTC confirmed Tatkal ticket booking

प्रतिनिधी, 19 नोव्हेंबर: रेल्वेने प्रवास करताना वेळेवर कन्फर्म तिकीट न मिळाल्यास तात्काळ तिकीट हा महत्त्वाचा पर्याय ठरतो. प्रवासाच्या एक दिवस आधी एसी क्लाससाठी सकाळी १० वाजता, तर नॉन-एसी क्लाससाठी सकाळी ११ वाजता तात्काळ बुकिंग सुरू होते. मात्र, बुकिंग सुरू होताच काही मिनिटांत सर्व जागा भरल्या जातात. अशा वेळी प्रवाशांची माहिती भरताना किंवा पेमेंट करताना थोडा जरी उशीर झाला, तरी तिकीट मिळण्याची संधी हुकते. त्यामुळे आयआरसीटीसीवर (IRCTC) तिकीट बूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या सेटिंग्स आधीच करून ठेवल्यास वेळेची बचत होऊन कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढते.

तात्काळ बुकिंगसाठी ‘आधार ऑथेंटिकेशन’ (Aadhaar Authentication) अत्यंत गरजेचे असते. यासाठी युजर्सनी आयआरसीटीसीच्या वेबसाईट किंवा ॲपवरील ‘My Account’ मध्ये जाऊन ‘Authenticate User’ या पर्यायावर क्लिक करावे. तिथे तुमचा आधार क्रमांक टाकून ओटीपीच्या (OTP) माध्यमातून व्हेरिफिकेशन पूर्ण करता येते. त्यासाठी आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. तसेच, बुकिंग दरम्यान ओटीपीची गरज भासू शकत असल्याने आयआरसीटीसी खात्यामध्ये आपला सध्या चालू असलेला आणि स्वतःजवळ असणारा मोबाईल नंबरच अपडेट ठेवावा.

ऐन वेळी प्रवाशाचे नाव, वय आणि जेंडर (लिंग) टाईप करण्यात बराच वेळ जातो. हा वेळ वाचवण्यासाठी आयआरसीटीसीवरील ‘My Master List’ मध्ये प्रवाशांची माहिती आधीच सेव्ह करून ठेवावी. यामुळे बुकिंग करताना पुन्हा पुन्हा तीच माहिती भरण्याची गरज भासत नाही. याव्यतिरिक्त, तिकीट बुकिंग सुरू होण्यापूर्वीच ट्रेनचा नंबर, प्रवासाची तारीख, बोर्डिंग स्टेशन, डेस्टिनेशन आणि आपल्या पसंतीची बर्थ या सर्व बाबी निश्चित करून ठेवाव्यात.

तिकीट मिळण्यात आणखी एक अडथळा पेमेंट प्रक्रियेत होणाऱ्या विलंबाचा असतो. त्यामुळे बुकिंग करताना पेमेंटची पद्धत आधीच तयार ठेवावी. जर तुम्ही युपीआय (UPI) द्वारे पेमेंट करणार असाल, तर ते ॲप तयार ठेवावे आणि त्याचा पिन नक्की लक्षात ठेवावा. तसेच बँक खात्यात पुरेशी रक्कम असल्याची खात्री करावी, जेणेकरून ऐन वेळी पेमेंट करताना कोणताही गोंधळ उडणार नाही.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही