मनोज जरांगे पाटलांचा नवा गौप्यस्फोट: ‘विरोधकांना पैसे वाटले जात आहेत, पुरावे थेट फडणवीसांना देणार’

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला असून, आपल्या विरोधात बोलणाऱ्यांना पैसे दिले जात असल्याचा आरोप करत पुरावे फडणवीसांना देणार असल्याचे म्हटले आहे.

Published On: 

Manoj Jarange Patil speaking to media regarding new allegations and 500 crore audio clip

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. जरांगे यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना सरकारकडून पैसे दिले जात असल्याचा मोठा दावा त्यांनी केला आहे. तसेच या सर्व प्रकाराचे पुरावे आपण थेट देवेंद्र फडणवीस यांना देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला असून, यामुळे भविष्यात आणखी काही गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी जरांगे पाटील यांनी एका कथित ऑडिओ क्लिपचा दाखला देत मोठी खळबळ उडवून दिली होती. भाजपकडून एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये घेतले आणि ते श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जरांगे यांना देण्यासाठी पाठवले, असा उल्लेख त्या क्लिपमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला होता. या क्लिपमुळे राज्यभरात मोठी चर्चा सुरू झाली होती.

या ऑडिओ क्लिपची चौकशी होणार नाही, कारण त्यात भाजपचे लोक आहेत, असा थेट आरोप जरांगे यांनी केला आहे. ते म्हणाले की, जर कारवाई केली तर मराठा समाजातून भाजप संपेल आणि नाही केली तर शिंदे साहेबांपासून मराठे दूर जातील. सामान्य माणूस असता तर आधी गुन्हा दाखल करून अटक केली असती आणि त्यानंतर एसआयटी नेमली असती. मात्र, पक्षातील लोकांना वाचवण्यासाठी गुन्हे दाखल न करताच आधी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे ते म्हणाले.

पैशांचे काहीही झाले तरी ही क्लिप बाहेर कशी गेली, याचाच मोठा धक्का संबंधितांना बसल्याची त्यांच्यात खासगी चर्चा असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. आता सरकारने एक नवी मोहीम उघडली असून, जरांगे पाटलांच्या विरोधात बोलणाऱ्याला लागेल तेवढे पैसे देण्याचे काम सुरू असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.

या सर्व घडामोडींचे पुरावे आपण फडणवीसांना देणार असल्याने ‘अजून काहीतरी वाजणार आहे’, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. जरांगे यांच्या या नव्या आणि खळबळजनक दाव्यांनंतर आता राज्य सरकारच्या वतीने यावर काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही