अजितदादांच्या पुतळा अनावरणाकडे मुश्रीफ, पटेलांची पाठ; पार्थ पवारांना स्टेजवर आधी शेवटच्या रांगेत स्थान, नंतर…

पुणे जिल्हा परिषदेत दिवंगत अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले. मात्र, या सोहळ्याकडे मुश्रीफ, पटेलांसह राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याने चर्चा रंगली आहे.

Published On: 

Amit Shah at Ajit Pawar statue unveiling event in Pune

पुणे, 18 नोव्हेंबर: पुणे जिल्हा परिषदेमध्ये दिवंगत अजित पवार यांच्या अर्धकृती पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मात्र, या महत्त्वाच्या सोहळ्याकडे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीतील अनेक प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

या कार्यक्रमाला महायुतीतील प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या सोहळ्यादरम्यान सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

पुण्यात झालेल्या या अनावरण सोहळ्याला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह छगन भुजबळ, हसन मुश्रीफ आणि प्रफुल्ल पटेल हे नेते अनुपस्थित राहिले. प्रमुख नेत्यांच्या या गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

कार्यक्रमादरम्यान स्टेजवर खासदार पार्थ पवार यांना सुरुवातीला शेवटच्या रांगेतील खुर्चीवर स्थान देण्यात आले होते. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यानंतर काही वेळाने त्यांच्या जागेत बदल करण्यात आला. त्यानंतर त्यांना थेट अमित शहा यांच्या पाठीमागे जागा देण्यात आली.

दुसरीकडे, अमित शहा यांचा दौरा संपण्यापूर्वीच पुणे महापालिकेने अनधिकृत बॅनरवर धडक कारवाई केली. पुणे विमानतळ ते मॅरियट हॉटेल या मार्गावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी लावलेले शिंदे गटाचे बॅनर पालिकेने हटवले आहेत. यासह इतरही अनधिकृत बॅनर काढण्यात आल्याने महापालिकेच्या या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही