रामाला वनवासात पाठवलं नसतं तर रामायण घडलंच नसतं; लारा दत्तानं मांडली कैकेयीची बाजू

‘रामायण’मध्ये कैकेयीची भूमिका साकारणाऱ्या लारा दत्ताने या पात्राची बाजू मांडली असून, कैकेयीने रामाला वनवासात पाठवले नसते तर रामायण घडलेच नसते, असे म्हटले आहे.

Published On: 

Lara Dutta defending character of Kaikeyi in Ramayana

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: नितेश तिवारी यांच्या आगामी ‘रामायण’ चित्रपटात कैकेयीची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ता हिने या पात्राबद्दल आपले मत स्पष्ट केले आहे. कैकेयीने प्रभू रामाला वनवासात पाठवले नसते, तर आज आपल्याला माहीत असलेले रामायण घडलेच नसते, असा दावा लाराने केला आहे.

रामायणातील कैकेयीचा उल्लेख होताच ती एका दुष्ट सावत्र आईच्या रूपात डोळ्यांसमोर उभी राहते, जिने आपला मुलगा भरताला राजा बनवण्यासाठी प्रभू रामाला १४ वर्षांचा वनवास दिला. मात्र, लाराच्या मते, कैकेयीचा हा निर्णय केवळ राग किंवा सत्तेच्या लालसेतून आलेला नव्हता. तर, एका आईचे प्रेम, स्वतःच्या मुलाच्या हक्कांविषयीची चिंता आणि राजा दशरथाला दिलेल्या एका जुन्या वचनामुळे तिने हे पाऊल उचलले होते.

या वचनामागची पार्श्वभूमी सांगताना लाराने नमूद केले की, कैकेयीने एकदा रणांगणावर राजा दशरथाचा जीव वाचवला होता. यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी तिला दोन वरदान देण्याचे वचन दिले होते. या कथेतील आणखी एका वळणाचा उल्लेख करत लारा म्हणाली की, लग्नापूर्वी दशरथाने कैकेयीच्या वडिलांनाही एक वचन दिले होते. कैकेयीने तिसरी राणी होऊ नये असे तिच्या वडिलांना वाटत होते, तेव्हा दशरथाने शब्द दिला होता की, कैकेयीचा मुलगा मोठा नसला तरी तोच अयोध्येचा राजा बनेल.

याच कारणामुळे भरताला त्याचे हक्क मिळावेत, अशी कैकेयीची धारणा होती. एका बाजूला रामावरील प्रेम आणि दुसरीकडे स्वतःच्या मुलाच्या हक्कांसाठी लढण्याची जबाबदारी, असा दुहेरी संघर्ष कैकेयीसमोर होता. अयोध्येसारख्या मोठ्या राज्याच्या राजकारणात आणि दरबारी कारस्थानांमध्ये भरताने आपला हक्क गमावू नये, या भीतीनेच कैकेयीने आपल्या मुलासाठी आवाज उठवला. हे पात्र साकारणे आपल्यासाठी अत्यंत आव्हानात्मक असल्याचेही लाराने सांगितले.

रामाला वनवास मिळाल्यानंतरच सीतेचे अपहरण आणि रावणासोबतचे युद्ध यांसारख्या महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामुळे कैकेयीने रामाला अयोध्येतून दूर पाठवण्याचा निर्णय घेतला नसता, तर आज आपण ऐकतो ती रामायणाची कथा कदाचित अस्तित्वातच आली नसती, असा निष्कर्ष लारा दत्तानं मांडला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही