डेव्हिड वॉर्नरचा क्रिकेट ऑस्ट्रेलियावर गंभीर आरोप; २०१८ च्या सँडपेपर गेट प्रकरणात ‘कव्हर-अप’चा दावा

डेव्हिड वॉर्नरने २०१८ च्या सँडपेपर गेट प्रकरणाच्या चौकशीबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियावर आरोप करत गोलंदाजांना वाचवल्याचा दावा केला आहे.

Published On: 

David Warner accusing Cricket Australia regarding Sandpapergate scandal.

प्रतिनिधी, 18 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने २०१८ मधील प्रसिद्ध सँडपेपर गेट (बॉल-टेम्परिंग) प्रकरणाची नव्याने चर्चा सुरू केली आहे. दक्षिण आफ्रिकेतील या प्रकरणाच्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (CA) केलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, वॉर्नरने बोर्डावर ‘कव्हर-अप’ (प्रकरण दडपण्याचा) आरोप केला आहे.

उस्मान ख्वाजाने नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘सब्र’ या आपल्या आत्मचरित्रात एक नवा दावा केला होता. केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात चेंडूवर सँडपेपर वापरण्याच्या योजनेची संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाला माहिती होती, असे ख्वाजाने म्हटले होते. या दाव्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, ऑस्ट्रेलियाच्या आजी-माजी खेळाडूंमध्ये नवा तणाव निर्माण झाला आहे.

आपल्या वैयक्तिक इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट करत वॉर्नरने म्हटले आहे की, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काही खेळाडूंना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि इतरांवर खापर फोडले. २०१८ मधील चौकशीदरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि नॅथन लायन या गोलंदाजांची चौकशीच केली नसल्याचा दावा वॉर्नरने केला आहे.

इन्स्टाग्रामवर वॉर्नरने म्हटले आहे की, “माझ्या माहितीनुसार, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २०१८ च्या चौकशीत जोश हेजलवूड, मिचेल स्टार्क किंवा नॅथन लायन यांची चौकशी केली नाही. जर हे खरे असेल, तर गोलंदाजांना याबाबत काहीच माहिती नव्हती हा दावा CA कसा काय करू शकते? हे पाहता त्यांनी सुरुवातीपासूनच कोणाला दोषी ठरवायचे हे ठरवले होते आणि आपला हेतू साध्य करण्यासाठी एक बोगस चौकशी केली. आता त्यांना असा खोटा समज कायम ठेवायचा आहे की गोलंदाजांना याबाबत काहीच कल्पना नव्हती. यातून प्रकरण दडपून टाकल्याचा दर्प येतो.”

वॉर्नरचे हे वक्तव्य ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार पॅट कमिन्सच्या एका पत्रकार परिषदेनंतर आले आहे. १२ नोव्हेंबर रोजी झालेल्या या पत्रकार परिषदेत कमिन्सने ख्वाजाचे दावे फेटाळून लावत, केपटाऊनमध्ये चेंडूची स्थिती बदलण्यासाठी सँडपेपर मैदानात आणल्याची कोणतीही माहिती नसल्याचे ठामपणे सांगितले. आपल्या माजी सहकाऱ्याला पाठिंबा देण्याऐवजी कमिन्सने ख्वाजाला अडचणीत आणल्याबद्दल वॉर्नरने त्याच्यावर टीका केली.

२०१८ मध्ये केपटाऊन कसोटीत कॅमेरून बॅनक्रॉफ्ट चेंडूवर सँडपेपर वापरताना पकडला गेला होता. त्यानंतर २०२१ मध्ये बॅनक्रॉफ्टने ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीनंतर पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि नॅथन लायन यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात त्यांनी चेंडूशी छेडछाड करण्यासाठी मैदानात कोणतीही बाह्य वस्तू नेल्याची माहिती असल्याचा इन्कार केला होता.

केपटाऊनमध्ये मोठ्या स्क्रीनवर टीव्ही फुटेज पाहिल्यानंतरच सँडपेपरच्या घटनेची माहिती मिळाल्याचे या खेळाडूंनी २०२१ मध्ये म्हटले होते. तसेच, घटना उघडकीस आल्यानंतर नायजेल लाँग आणि रिचर्ड इलिंगवर्थ या पंचांनी चेंडूची तपासणी केली होती, मात्र कोणतेही दृश्य नुकसान न दिसल्यामुळे चेंडू बदलला नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

२०२१ च्या त्या संयुक्त निवेदनात ऑस्ट्रेलियन स्टार्सनी म्हटले होते, “न्यूलँड्समध्ये त्या दिवशी मैदानावर जे घडले त्याचे समर्थन यापैकी कोणत्याही गोष्टीने होत नाही. ते चुकीचे होते आणि तसे कधीही घडायला नको होते.”

📌 महत्वाच्या बातम्या

Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही