पुण्यात पार्थ पवारांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर आमदारांनी दिले थेट उत्तर

पुण्यात पार्थ पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची ‘जिजाई’ बंगल्यावर बैठक पार पडली. यानंतर आमदारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर स्पष्टीकरण दिले आहे.

Published On: 

Parth Pawar meets Sharad Pawar

पुणे, 13 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच, शुक्रवारी (१३ तारखेला) पुण्यात पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पक्षाचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि मोजक्या आमदारांची एक बैठक पार पडली. पुण्यातील ‘जिजाई’ बंगल्यावर झालेल्या या बैठकीला आमदार चेतन तुपे, आमदार माऊली कटके आणि आमदार शंकर मांडेकर उपस्थित होते. पार्थ पवार यांनी ठराविक आमदारांनाच बोलावून ही तातडीची बैठक का घेतली, यावरून राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र, बैठकीनंतर उपस्थित आमदारांनी या भेटीमागचे कारण स्पष्ट केले आहे.

याबाबत माहिती देताना आमदार शंकर मांडेकर यांनी स्पष्ट केले की, ही कोणतीही अधिकृत बैठक नव्हती. दरवर्षी पाडव्याला सर्वजण अजितदादांना भेटण्यासाठी बारामतीला जातात. मात्र, ‘यावेळी दादा गेल्यामुळे त्यांनी दिवाळी साजरी केली नाही आणि सुनेत्रा वहिनी कोणालाही भेटल्या नाहीत’, असे मांडेकर म्हणाले. दिवाळीनिमित्त आणि मतदारसंघातील विकासकामांच्या अनुषंगाने सुनेत्रा वहिनींची पुण्यात भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुळशी तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही, ही आपली प्रमुख मागणी होती आणि आचारसंहिता संपल्याने आता विकासकामे वेगाने मार्गी लागतील, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या शक्यतेवर बोलताना मांडेकर यांनी स्पष्ट केले की, विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. ‘आम्ही केवळ तीन आमदार होतो, तीन आमदार थोडीच विलिनीकरणावर चर्चा करतील. पार्थ पवार यावर काहीच बोलले नाहीत, आमचे काम सुनेत्रा वहिनींकडे होते,’ असे ते म्हणाले. शरद पवार हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्याकडे सर्वच पक्षांचे लोक जातात. विलिनीकरणाबाबत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल, तो आपल्याला मान्य असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण अजितदादांवर प्रेम करणारे कार्यकर्ते असून सुनेत्रा वहिनी आणि त्यांचे कुटुंब जो निर्णय घेईल तो मान्य राहील, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

आमदार माऊली कटके यांनीही या भेटीबाबत आपली प्रतिक्रिया दिली. दरवर्षी पाडव्यानिमित्त बारामतीला जाण्याची परंपरा आहे, मात्र यावेळी दादा नसल्याने वहिनींना भेटण्यासाठी पुण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत विधानसभा आणि पुणे जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आपल्याला कोणताही फोन आला नसून, शरद पवारांच्या भेटीबाबत काहीही सांगता येणार नाही, असे कटके यांनी स्पष्ट केले. ही केवळ दिवाळीची सदिच्छा भेट आणि दुष्काळी परिस्थितीवरील चर्चा होती, अशी माहिती त्यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही