परळी, 12 नोव्हेंबर: परळीत दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने आयोजित एका दुकानाच्या उद्घाटन सोहळ्यात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. यावेळी सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांना जाहीर व्यासपीठावरून भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या. ‘माझा भाऊ मंत्री होऊ दे’ असे म्हणत त्यांनी केलेल्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, परळीला नेहमीच सत्ताकेंद्र असण्याची सवय आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा उल्लेख ‘माजी मंत्री’ असा करताना काहीतरी वेगळेच वाटते. भाऊ म्हणून धनंजय मुंडे यांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देताना त्यांनी, “भाऊ, इडा-पिडा जाऊ दे, बळीचं राज्य येऊ दे, असे म्हणतात. पण मी मात्र इडा-पिडा जाऊ दे आणि भाऊचं राज येऊ दे, असे म्हणेन,” अशी प्रतिक्रिया दिली.
तसेच, पुढच्या दिवाळीला तुमचा उल्लेख नक्कीच मंत्री म्हणूनच करेन, असे सूचक वक्तव्यही सुषमा अंधारे यांनी केले. सध्या राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला आहे. नेमक्या याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजकीय पुनरागमनाबाबत व्यक्त केलेल्या या अपेक्षेचे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानात पोलिसांच्या पथकावर मोठा दहशतवादी हल्ला; डीएसपीसह ११ जण ठार, १२ जखमी
- संजय राऊतांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार; आदिवासी योजनांचीही दिली माहिती
- इंग्लंड संघात दोन मोठे बदल; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून जेकब बेथेल आणि जोश टंग बाहेर
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







