प्रतिनिधी, 12 नोव्हेंबर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेवर सुनेत्रा पवार यांनी एका वाक्यात सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “जशी वेळ येईल तशा गोष्टी आपल्याला कळतील,” असे म्हणत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित एका पत्रकार परिषदेनंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.
बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आयोजित या पत्रकार परिषदेत प्रामुख्याने आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये आश्रमशाळांमधील बदल, पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेतील वाढीव भत्ता, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, महिला तसेच युवकांसाठीच्या विशेष योजना आणि आदिवासी जमातींसाठीच्या आर्थिक पॅकेजेसवर सविस्तर चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांनी त्यांचा मोर्चा राजकीय प्रश्नांकडे वळवला.
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही ‘वरिष्ठच बोलतील’ अशी भूमिका मांडली होती. दुसरीकडे, संजय राऊत यांनी २०-२२ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला आहे. या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी दिलेले हे त्रोटक उत्तर आगामी काळात राज्यात काय घडामोडी घडतात, याबाबतची उत्सुकता वाढवणारे ठरले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- जळगाव हादरलं! दारूच्या नशेत पोटच्या मुलाकडून दोन्ही डोळ्यांनी अधू असलेल्या ७३ वर्षीय आईची निर्घृण हत्या
- हर्षल पटेल गुजरात टायटन्समध्ये जाणार? टॉम बँटनसोबत ट्रेड किंवा रोख व्यवहारावर सनरायझर्स हैदराबादची चर्चा
- अर्शदीप सिंगचा समरीनसोबत साखरपुडा; टीम इंडियाच्या गोलंदाजाच्या सिनेस्टाईल प्रपोजलचे फोटो व्हायरल
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








