उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? गुलाबराव पाटलांच्या विधानाने उडवली खळबळ

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘इंजिन-डब्या’चे उदाहरण देत सूचक विधान केले आहे.

Published On: 

Eknath Shinde criticized Uddhav Thackeray

प्रतिनिधी, 11 नोव्हेंबर: महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच, आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काल शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची अचानक भेट घेतली. या भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली असून, आता शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनीही सूचक विधान करत या शक्यतेला बळ दिले आहे.

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे खरोखरच एकत्र येणार का, असा थेट प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला होता. यावर ती शक्यता न फेटाळता त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “मी यावर काही सांगू शकत नाही. शेवटी मी एक आगगाडीचा डबा आहे आणि आमचे एकनाथ शिंदे हे इंजिन आहेत. त्यामुळे इंजिन जिथे असेल, तिथेच डबा जाणार,” असे म्हणत पाटलांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. यावर बोलताना पाटील म्हणाले की, कोणी कोणासोबत एकत्र यावे किंवा येऊ नये हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत आणि त्यांच्या आजारपणामुळे सुनेत्रा पवार त्यांना भेटायला जाऊ शकतात. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचीही चर्चा सुरू असू शकते, मात्र आपण त्या पक्षाचे नेते नसल्याने आपल्याला यातील कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीचे २० ते ३० आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता, त्यावरही पाटलांनी जोरदार टीका केली. राऊत यांचे किती दावे खरे ठरतात याची टक्केवारी काढली तर ती शून्य असल्याचे ते म्हणाले. राऊत कायम एखाद्या भविष्यकाराप्रमाणे बोलत असतात, मात्र त्यांची कोणतीही भविष्यवाणी खरी ठरत नाही. चुकीचा अंदाज वर्तवणारे ते एक फेल हवामान शास्त्रज्ञ आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.

दरम्यान, गोकुळच्या निवडणुकीवरून संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनाही गुलाबराव पाटील यांनी सडेतोड उत्तर दिले. कोरम पूर्ण होत नसेल तर काही गोष्टींवर नाइलाज असतो, कारण शेवटी संस्था चालवणे हे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना जो निर्णय योग्य वाटला तो त्यांनी घेतला आहे. त्यावर टीका करणे हे विरोधकांचे कामच असून त्यांनी ते बोलत राहिले पाहिजे, असा टोला पाटील यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही