नागपूर, 11 नोव्हेंबर: नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या १० वर्षीय मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. मागील तीन महिन्यांपासून हा नराधम आपल्याच मुलीवर अत्याचार करत होता, मात्र वडिलांच्या दहशतीमुळे चिमुकलीने याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते.
पीडित मुलगी कुटुंबासह पाचपावली परिसरात एका भाड्याच्या घरात राहते. तिची आई एका खासगी रुग्णालयात केअरटेकर म्हणून नोकरी करते, तर वडील मेकॅनिक आहेत. या दाम्पत्याचे २०१३ मध्ये लग्न झाले असून त्यांना १३ वर्षांचा मुलगा आणि १० वर्षांची मुलगी आहे. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होते. अशातच १० वर्षीय मुलीच्या प्रकृतीत बिघाड होऊ लागला. तिच्या गुप्तांगाला वारंवार जंतूसंसर्ग आणि रक्तस्राव होत असल्याचे आईच्या निदर्शनास आले.
मुलीच्या या शारीरिक त्रासामुळे आणि तिच्यासोबत काहीतरी अघटित घडत असल्याच्या संशयावरून आईने घरात गुपचूप एक सीसीटीव्ही कॅमेरा बसवला. रविवारी या कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता, जन्मदाता बापच मुलीवर बळजबरीने अत्याचार करत असल्याचे भयंकर दृश्य उघड झाले.
हा प्रकार पाहिल्यानंतर हादरलेल्या आईने तत्काळ पाचपावली पोलीस ठाणे गाठून पतीविरोधात रीतसर तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या पुराव्यावरून तत्परतेने कारवाई करत आरोपी पित्याविरुद्ध पोक्सो (POCSO) कायद्यासह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि त्याला त्वरित बेड्या ठोकल्या.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माकडे MI तर रियान परागकडे पुन्हा RR चं कर्णधारपद; हार्दिक-अर्शदीपची टीम बदलणार
- रजत पाटीदारची आशिया कपमधून माघार; ‘इंडिया अ’ संघात आयुष बदोनीला संधी
- मोहम्मद शमीवर कसोटी निवृत्तीसाठी बीसीसीआयने दबाव टाकला का? राजीव शुक्लांनी दिले स्पष्टीकरण
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








