गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून राजेश पाटील रिंगणात; ‘फेटा न बांधण्याच्या’ निर्धाराची पुन्हा चर्चा

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीने राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सतेज पाटील गटाकडून शशिकांत पाटील-चुयेकर रिंगणात आहेत.

Published On: 

NCP leader Rajesh Patil Mahayuti candidate for Gokul Chairman election

प्रतिनिधी, 10 नोव्हेंबर: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जोपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार केलेल्या राजेश पाटील यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे, सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांना रिंगणात उतरवले आहे.

अध्यक्षपदाची ही निवडणूक आज पार पडत असून, दुपारी दोनच्या सुमारास गोकुळच्या नव्या अध्यक्षाच्या नावाची घोषणा होणार आहे. तत्पूर्वी, साडेबारा वाजता गोकुळ दूध संघालगतच्या गोकुळ चौकातील मंडपात महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सभा आयोजित करण्यात आली आहे.

राजेश पाटील हे कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २०१९ मध्ये ते या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी त्यांचा धक्कादायक पराभव केला. हसन मुश्रीफ आणि अजित पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून राजेश पाटील ओळखले जातात. त्यांच्या या पराभवामुळे व्यथित झालेल्या अजित पवारांनी आपल्या कोल्हापूर दौऱ्यात फेटा बांधून घेण्यास नकार दिला होता. राजेश पाटील यांना राजकीय पार्श्वभूमी लाभली असून, त्यांचे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील हेदेखील चंदगडचे आमदार होते.

राजेश पाटील हे संजय मंडलिक यांचे मेहुणे आहेत. गेल्या गोकुळ निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी आणि संजय मंडलिक यांच्या मुलाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवावरून मंडलिक गटाने हसन मुश्रीफ यांच्यावर टीकाही केली होती. मात्र, आता स्वतः मुश्रीफ गटानेच राजेश पाटील यांना अध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने हा जुना वाद संपुष्टात आला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही