प्रतिनिधी, 9 नोव्हेंबर: कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघात शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून निर्माण झालेल्या वादात आता नवनाथ बन यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, गोकुळच्या प्रश्नावर वर्षा बंगल्याऐवजी उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’वर मोर्चा काढण्याचा सल्ला बन यांनी दिला आहे.
गोकुळमध्ये शासननियुक्त संचालकांमुळे सत्ता हातून निसटण्याची भीती सतेज पाटील यांना वाटत असून, हा वाद सध्या न्यायालयात पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत भाजप आणि महायुतीवर टीका केली होती. ‘लोकांचा कौल नाकारून पराभूतांच्या हाती सत्ता देणे केवळ आपल्याच देशात घडू शकते. कोल्हापुरातील निर्णय लोकशाहीसाठी दुर्दैवी असून याविरोधात केवळ कोल्हापुरात नाही, तर राजभवन, मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर मोर्चा काढला पाहिजे,’ असे राऊत म्हणाले होते.
राऊत यांच्या याच वक्तव्याचा समाचार घेत नवनाथ बन यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, संजय राऊत वर्षावर मोर्चा काढण्याची भाषा करत आहेत, पण खऱ्या अर्थाने या मोर्चाची सुरुवात मातोश्रीवरून झाली पाहिजे. कारण २०१९ साली भाजप-महायुतीला स्पष्ट बहुमत असताना ते नाकारून काँग्रेससोबत जात उद्धव ठाकरे यांनीच लोकशाहीची हत्या केली होती आणि लोकशाहीचा गळा घोटण्याची परंपरा सुरू केली होती, अशी घणाघाती टीका बन यांनी केली.
गोकुळमधील सत्तेबाबत बन यांनी स्पष्ट केले की, तेथे लोकशाहीच्याच मार्गाने सत्ता स्थापन होणार आहे. तिथे लोकशाहीचा सन्मान होईल आणि लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सदस्यांचीच सत्ता येईल, त्यामुळे संजय राऊत यांनी चिंता करू नये. लोकशाहीचा मंत्र वाचवण्यासाठी राऊतांना मोर्चा काढायचाच असेल तर तो मातोश्रीवरच काढावा, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- आयटी सेलकडून मला धमक्या, पण भूमिकेवर ठाम; कोल्हापुरात विवेकानंद पाटील यांचा एल्गार
- लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार; खासदार ज्योती वाघमारेंचा मोठा दावा
- IND vs NZ 3rd ODI: मालिका विजयाच्या उंबरठ्यावर भारत; जाणून घ्या पिच रिपोर्ट, हवामान आणि संभाव्य Playing 11
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







