प्रतिनिधी, 9 नोव्हेंबर: शिवसेना नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “सुनील तटकरे कुणाचेही होऊ शकत नाहीत,” अशा शब्दांत कदम यांनी त्यांच्या राजकीय निष्ठेवर आणि कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. तसेच, तटकरे यांनी आपल्या औकातीत राहावे, अन्यथा त्यांनाही सोडणार नाही, असा थेट इशारा कदम यांनी दिला आहे.
कदम यांनी तटकरेंवर जलसिंचन प्रकल्पांवरून अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. कोकणातील १६ धरणांसह कोयना धरण प्रकल्पाशी संबंधित तब्बल ७० हजार कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचारात तटकरे यांचा सहभाग असल्याचा मोठा दावा कदम यांनी केला.
गेल्या २५ वर्षांपासून कोयना धरणाचे काम बंद पडण्यामागे तटकरे यांचेच पाप असल्याचा घणाघात कदम यांनी केला. त्यांच्या या कृतीमुळे १४ गावांतील नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागल्याचे ते म्हणाले. यासोबतच, गुहागर मतदारसंघातील एका प्रकरणात तटकरे यांनी केलेल्या कथित मदतीचा दाखला देत त्यांच्या भूमिकेवरही कदम यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
विशेष म्हणजे, अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर तटकरे यांच्यावरील हे आरोप मागे घेतले गेल्याचा दावाही रामदास कदम यांनी यावेळी केला.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्री माझं ऐकतात, ही भाजप नेत्यांची दंतकथाच’; राज ठाकरेंची फटकेबाजी
- गोकुळच्या षडयंत्रामागे पुण्याच्या दादांचा हात; विवेकानंद पाटलांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल
- व्हिक्टोरियन क्रिकेटमधील बॉल टॅम्परिंगबाबत स्कॉट बोलंडने उस्मान ख्वाजाचे दावे फेटाळले
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







