महाराष्ट्रासह २१ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ९० किमी वेगाने वाहणार वादळी वारे

हवामान विभागाने २ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह २१ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

Published On: 

Rain clouds representing IMD heavy rain alert due to low pressure

प्रतिनिधी, 1 नोव्हेंबर: मान्सूनचा हंगाम संपला असला तरी देशावरील नैसर्गिक आपत्तीचे सावट अद्याप दूर झालेले नाही. हवामान विभागाने (IMD alert) दिलेल्या नव्या अंदाजानुसार, उद्या, २ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली आणि ओडिशा अशा एकूण २१ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आग्नेय बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पूर्वेकडील राज्यांमध्ये वादळासह पावसाचा अलर्ट दिला आहे. या चक्रीवादळाचा फटका चारहून अधिक राज्यांना बसण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर आणि पूर्व भारतातील तापमानात ७ ते ८ अंशांची घसरण होऊ शकते. डोंगराळ राज्यांच्या काही भागांत भूस्खलनाचा धोका असून, चारपेक्षा जास्त राज्यांत मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे, उत्तर प्रदेशच्या आसपास पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडणार आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आणि लगतच्या परिसरात वरच्या थरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. या वादळी पावसामुळे मोठी झाडे उन्मळून पडण्याची भीती आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, २ नोव्हेंबरला उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, झारखंड, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, जम्मू-काश्मीर, ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आसाम आणि सिक्कीम या २१ राज्यांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडेल.

महाराष्ट्राचा विचार केल्यास, ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहील. मात्र, विदर्भ, दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक आणि हलक्या पावसाची, तसेच मेघगर्जनेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही