दिल्ली, 1 नोव्हेंबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महारॅलीत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर आमचा मोर्चा थेट मोदींकडे वळणार आहे, असा मोठा इशारा राहुल गांधी यांनी यावेळी दिला.
या सभेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते. या महारॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केले. ‘लोकांच्या यंत्रणा हायजॅक करण्यात आल्या आहेत. परंतु आम्ही देशातील लोकशाही आणि संविधानाला संपू देणार नाही,’ असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मतचोरी ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना असल्याचे सांगत ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवावेच लागेल, अशी मागणी त्यांनी केली. ‘ज्ञानेश कुमार नसते तर मोदी पंतप्रधान झालेच नसते. देशाच्या १५ टक्के म्हणजेच २०२४ नंतर साडेतेरा कोटी मतदारांना मतदान यादीतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे २०२४ ची निवडणूक बेकायदेशीर होती,’ असा दावा राहुल गांधी यांनी केला.
उद्योगपती आणि शेतकरी यांच्यातील भेदभावावरही त्यांनी भाष्य केले. मोठ्या उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ केले जाते, पण शेतकरी कर्ज फेडू शकला नाही की त्याला जेलमध्ये टाकले जाते, असे ते म्हणाले. ‘ही महारॅली भारताच्या जनतेचा आवाज आहे. तुम्ही विसरू नका, आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही,’ असे सांगत ज्ञानेश कुमार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- राज्यातील शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भरघोस मदतीची ग्वाही
- ग्लेन फिलिप्सचा जागतिक विक्रम; द्विपक्षीय टी-२० मालिकेत केल्या सर्वाधिक धावा
- “निकाल वेगळाही असू शकला असता”: भारताकडून ३-२ ने मालिका गमावल्यानंतर मिचेल सँटनरची प्रतिक्रिया
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








