दिल्ली, 1 नोव्हेंबर: खासदार संजय राऊत यांनी दिल्ली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधारी भाजप, निवडणूक आयोग आणि विरोधी नेत्यांवर सडकून टीका केली. दिल्लीतील रामलीला मैदानावरील आंदोलनामागची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी, “देशात सुरू असलेली रावणलीला संपवण्यासाठी आम्ही सर्व रामाचे सैनिक एकत्र आलो आहोत,” असा घणाघात केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. “मॉक पार्लमेंटमध्ये जनतेने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला असून, नैतिकदृष्ट्या त्यांना आता या पदावर राहण्याचा अधिकार नाही,” असे त्यांनी (Sanjay Raut) स्पष्ट केले.
राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, “बाळासाहेब ठाकरे हे माझे दैवत आणि शिक्षक आहेत. त्यांनीच मला लेखणी धरून लिहायला शिकवले. त्यामुळे ते माझ्यावर चिडले तरी तो माझा आशीर्वाद आणि गौरवच आहे.”
याशिवाय, ठाण्यात घडलेल्या राम पुर्णेकर प्रकरणावरून राऊत यांनी ठाणे पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणात आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवरच कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भावूक झाला सायमन हार्मर, सांगितला १० विकेट्स घेण्यापर्यंतचा प्रवास
- रवींद्र धंगेकरांचा नवनाथ बन यांच्यावर पलटवार, उपहासात्मक कार्टून शेअर करत म्हणाले ‘ही याची लायकी…’
- ‘लेक लाडकी’ योजनेच्या नियमात मोठा बदल; आता ‘महाडीबीटी 2.0’वरून थेट ऑनलाइन अर्ज करता येणार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








