नागपूर, 25 ऑक्टोबर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी त्यांच्या खास शैलीत राजकीय नेत्यांच्या प्रवृत्तीवर मिश्किल शब्दांत टीका केली आहे. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी राजकारण्यांच्या दिखावेगिरीवर आणि जबाबदारी टाळण्याच्या वृत्तीवर बोट ठेवले. राजकारणात अनेक हुशार नेते केवळ दिखावा करतात, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.
‘राजकारणात असे अनेक चतुर नेते असतात, जे केवळ बोटाने मलम लावण्याचे काम करतात. ते कडक कपडे घालून मंचावर येतात आणि स्वतःचे इम्प्रेशन पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुख्य नेते निघून गेले की हे लोकही पळून जातात,’ असा टोला गडकरी यांनी लगावला. या नेत्यांची चतुराई दिसून येते, पण त्यांच्याकडे कामाची कोणतीही ‘ओनरशिप’ नसते आणि दुर्दैवाने राजकारणात हे सर्व चालून जाते, असेही ते म्हणाले.
राजकीय नेत्यांच्या मानसिकतेवर भाष्य करताना गडकरी यांनी महादेवाच्या मंदिरात दूध अर्पण करण्याचे एक रंजक उदाहरण दिले. पाऊस पडावा म्हणून सर्वांना महादेवाला दूध वाहण्यास सांगितले, तर राजकारणी लोक तिथे केवळ पाणी टाकतील आणि दुधाचा थेंबही दिसणार नाही, असे ते म्हणाले. साहेबांनी सांगितल्यामुळे गाव तर दूध टाकणारच आहे, मग आपण आपले दूध का संपवायचे, असा विचार हे नेते करतात, अशी कोपरखळी त्यांनी मारली.
नुसते सौम्य राहून किंवा केवळ मिरवून उपयोग नसून शेवटी काहीतरी ठोस फलनिष्पत्ती मिळायला हवी, असे आवाहन गडकरी यांनी केले. प्रत्येक नेत्याने ओनरशिप घेऊन आपल्या गावात आणि मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष काम उभे करून चित्र बदलले पाहिजे, असा संदेशही त्यांनी या वेळी दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पटोले यांचा खळबळजनक दावा: ‘IB च्या रिपोर्टनुसार माविआचे १६० आमदार निवडून येणार होते, पण बोगस मतदानातून कट रचला’
- प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येला २७ दिवस; ‘पोलिसांचे ८० टक्के काम मीच केले, पण दबावामुळे केवळ सोंग सुरू’, मुलाचा खळबळजनक आरोप
- शांततापूर्ण आंदोलने दाबल्यास नेपाळ, बांगलादेशसारखी स्थिती उद्भवेल; सोनम वांगचूक यांचा सरकारला इशारा
Quick Answers
नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी राजकारण्यांच्या दिखावेगिरीवर आणि जबाबदारी टाळण्याच्या वृत्तीवर बोट ठेवले.
राजकारणात असे अनेक चतुर नेते असतात, जे केवळ बोटाने मलम लावण्याचे काम करतात, कडक कपडे घालून मंचावर इम्प्रेशन पाडतात आणि मुख्य नेते निघून गेल्यावर पळून जातात, असा टोला गडकरी यांनी लगावला. तसेच या नेत्यांकडे कामाची कोणतीही 'ओनरशिप' नसते, असेही ते म्हणाले.
गडकरी यांनी महादेवाच्या मंदिरात दूध अर्पण करण्याचे उदाहरण दिले; पाऊस पडावा म्हणून सर्वांना महादेवाला दूध वाहण्यास सांगितले तर राजकारणी लोक तिथे केवळ पाणी टाकतील आणि दुधाचा थेंबही दिसणार नाही, असे ते म्हणाले.
नुसते सौम्य राहून किंवा मिरवून उपयोग नसून काहीतरी ठोस फलनिष्पत्ती मिळायला हवी, असे गडकरी म्हणाले. तसेच प्रत्येक नेत्याने ओनरशिप घेऊन आपल्या गावात आणि मतदारसंघात शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष काम उभे करून चित्र बदलले पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








