सध्या ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत असल्यामुळे राज्याच्या (Maharashtra Weather Update) अनेक भागांत उकाड्याने अक्षरशः घाम फोडला आहे. त्यातच हवामान विभागाने आता एक असा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे तापलेल्या वातावरणात अचानक मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
सध्या मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या पट्ट्यात उष्ण आणि दमट हवामानाचा ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पण दुसरीकडे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली सक्रिय होत असल्याने, येत्या २७, २८ आणि २९ ऑक्टोबरला राज्याच्या अनेक भागांत धो धो पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Forecast
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन आठवड्यांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात. आज सायंकाळीही सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दुसरीकडे, उर्वरित राज्यात मात्र आज उष्ण वातावरणच पाहायला मिळेल. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस तरी हवामान पूर्णपणे कोरडं राहण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहिती हाती आल्यावर बातमी अपडेट केली जाईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- दुसऱ्या टी-२० सामन्यात वैभव सूर्यवंशीला तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्याच्या निर्णयावर मुरली कार्तिक यांचा आक्षेप
- ऑडिओ क्लीप प्रकरण: ‘भिकार कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना’, सुषमा अंधारेंची जहरी टीका
- “संपूर्ण भारताचा तुझ्यावर विश्वास”, न्यूझीलंडला नमवल्यानंतर तिलक वर्माने उलगडले यशाचे रहस्य
Quick Answers
सध्या मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या पट्ट्यामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली सक्रिय होत असल्यामुळे येत्या २७, २८ आणि २९ ऑक्टोबरला राज्याच्या अनेक भागांत धो धो पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील दोन आठवड्यांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळू शकतात.
मराठवाडा आणि विदर्भात पुढील दोन दिवस तरी हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याची शक्यता आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








