प्रतिनिधी, 25 ऑक्टोबर: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला आज २७ दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्याप न्याय मिळाला नसल्याची खंत त्यांचा मुलगा राम पूर्णेकर याने व्यक्त केली आहे. पोलिसांना आवश्यक असलेले सर्व पुरावे आपण दिले असून, त्यांचे ८० टक्के काम स्वतःच केल्याचा दावा राम यांनी केला आहे. तसेच, राजकीय दबावामुळे या प्रकरणात न्याय मिळत नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत राम पूर्णेकर यांनी राजकीय नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? पोलिसांना हवे ते सर्व पुरावे आम्ही दिले आहेत. परंतु राजकीय दबावामुळे पोलीस फक्त चौकशीचे सोंग करत आहेत, अशी खंत त्यांनी या पोस्टमध्ये मांडली. आज आपण हतबल झालो असलो तरी, वडील लढवय्ये होते आणि त्यांच्याप्रमाणेच न्याय मिळेपर्यंत आपला लढा सुरू राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या भूमिकेला नेटकऱ्यांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे.
काल झालेल्या एका पत्रकार परिषदेत राम यांनी अनेक धक्कादायक दावे केले. मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. यावेळी त्यांनी एक सीसीटीव्ही फुटेजही दाखवले. यामध्ये पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये पप्या शिंदे याची गाडी दिसत असून, तो संपूर्ण परिसर मिनाक्षी शिंदे यांच्या घराजवळचा असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळी ८.१० ते ८.४० या वेळेत आरोपी त्यांच्या घराच्या परिसरात का फिरत होते, असा सवाल राम यांनी उपस्थित केला.
पोलिसांकडून आपल्या कुटुंबावर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी कासारवडवली पोलीस ठाण्याचे अधिकारी सलग तीन तास आपल्या घरी बसून होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार नाही, असे लिहून घेत त्यावर आपली सक्तीने स्वाक्षरी घेण्यात आली. संबंधित पत्रावरील हस्ताक्षर आपले नसल्याचेही राम यांनी स्पष्ट केले. हा विषय इतका वाढेल असे वाटले नसल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणात खासदार संजय राऊत, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह सर्वपक्षीय नेते घरी येऊन गेले, मात्र त्यांच्याकडून केवळ आश्वासने मिळाली. कोणत्याही पक्षाची आक्रमक भूमिका दिसली नसल्याचे राम म्हणाले. मी कोणत्याही पक्षाचा नाही, वडिलांना न्याय मिळावा म्हणून सर्वांकडे हात जोडून भीक मागतोय. पोलिसांची मदत करत असतानाही या नवरा-बायकोला अटक न करता त्यांना सूट दिली जात आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला. या दोघांना आधी आत टाका, अन्यथा उद्या एखादा गरीब माणूस निवडणुकीला उभा राहिल्यास त्यालाही मारून टाकतील, अशी भीती व्यक्त करत त्यांनी कारवाईची मागणी केली.
📌 महत्वाच्या बातम्या
- “संपूर्ण भारताचा तुझ्यावर विश्वास”, न्यूझीलंडला नमवल्यानंतर तिलक वर्माने उलगडले यशाचे रहस्य
- मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक म्हणून किरॉन पोलार्डने सांगितली पहिली प्राथमिकता; चाहत्यांसाठी दिला खास संदेश
- “तिलक वर्मा आणि रेड्डीने अत्यंत खंबीरपणा दाखवला”: न्यूझीलंडवरील रोमहर्षक विजयानंतर श्रेयस अय्यरने केले फलंदाजांचे कौतुक
Quick Answers
त्यांच्या मुलाने, राम पूर्णेकर यांनी दावा केला आहे की पोलिसांना आवश्यक असलेले सर्व पुरावे त्यांनी दिले असून पोलिसांचे ८० टक्के काम स्वतःच केले आहे. मात्र राजकीय दबावामुळे पोलीस फक्त चौकशीचे सोंग करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रकार परिषदेत राम पूर्णेकर यांनी मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी लावून धरली.
राम पूर्णेकर यांच्या आरोपानुसार, १३ ऑक्टोबर रोजी कासारवडवली पोलीस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या घरी तीन तास बसून होते आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करणार नाही असे लिहून घेत त्यांच्याकडून सक्तीने स्वाक्षरी घेण्यात आली.
खासदार संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह सर्वपक्षीय नेते घरी येऊन गेले, मात्र त्यांच्याकडून केवळ आश्वासने मिळाली आणि कोणाचीही आक्रमक भूमिका दिसली नाही, असे राम यांनी म्हटले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








