गिरीश महाजन कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न, जनतेशी देणंघेणं नाही; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जळगावात बोलताना मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न असल्याची जोरदार टीका केली आहे.

Published On: 

Girish Mahajan on Manoj Jarange demands

जळगाव, 25 ऑक्टोबर: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. जळगाव येथे बोलताना दानवे म्हणाले की, मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न आहेत. त्यांना सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाचे कोणतेही देणेघेणे राहिलेले नाही.

महाजन हे सध्या सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त असून ते मोठे भांडवलदार आणि सरंजामदार झाले आहेत, अशी जहरी टीका दानवे यांनी केली. महाजन हे बहुतांश वेळ मुंबई आणि पुण्यातच असतात, ते जिल्ह्यात फिरकतही नाहीत. तसेच, त्यांच्या नातेवाईकांना बोगस ऑर्डरप्रकरणी पकडण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपबाबतही दानवे यांनी भाष्य केले. या ५०० कोटींचा संबंध भाजपच्या मीडिया इन्चार्जशी असल्याचे ते म्हणाले. हे ५०० कोटी रुपये कोणी आणि कसे दिले, याची पूर्ण माहिती संबंधित महिलेला आहे.

या प्रकरणातील महिलेवर तत्काळ गुन्हा दाखल करून तिची सखोल चौकशी व्हावी आणि तिला तुरुंगात टाकावे, अशी मागणी दानवे यांनी केली. तुमच्या-आमच्यासारखा सामान्य माणूस असता तर पोलिसांनी लगेच कारवाई केली असती, मग आता राज्यातील पोलीस काय झोपले आहेत का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. हे ५०० कोटी रुपये कुठून आणले आणि कोणाला दिले, याचा शोध घेणे अत्यंत गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

अंबादास दानवे यांच्या आरोपानुसार, मंत्री गिरीश महाजन हे कुंभमेळ्याची दलाली खाण्यात मग्न असून त्यांना सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखाचे कोणतेही देणेघेणे राहिलेले नाही. ते सत्तेची फळे चाखण्यात व्यस्त असून मोठे भांडवलदार आणि सरंजामदार झाले आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही