प्रतिनिधी, 24 ऑक्टोबर: मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे पाटील यांना भाजपने दिलेले ५०० कोटी रुपये खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवले, असा दावा एका ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला होता. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच, आता श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
या दाव्यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, “ते ५०० कोटी रुपये माझ्यापर्यंतही पोहोचलेले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांना जो प्रश्न पडला आहे, तोच मलाही पडला आहे. ५०० कोटी रुपये कुठे गेले? तेच पैसे मी आता शोधायला चाललो आहे.” तसेच ५०० कोटी रुपये एकत्र कसे दिसतील आणि त्यासाठी किती गाड्या लागतील, याचाच विचार आणि चर्चा आम्ही करत होतो, असा टोलाही त्यांनी लगावला.
या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती श्रीकांत शिंदे यांनी दिली. कोण काय बोलतंय यावर प्रश्न विचारले जात असून आपण स्वतः दोन दिवस ५०० कोटी रुपये कुठे गेले याचा ‘रिसर्च’ करत होतो आणि याबाबत काही कळाले तर नक्की सांगू, असेही ते पुढे म्हणाले.
व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये ५०० कोटींच्या दाव्याव्यतिरिक्त विधानसभा निवडणुकीतील जरांगे पाटील यांच्या भूमिकेबाबतही चर्चा करण्यात आली होती. ही क्लिप समोर आल्यानंतर जरांगे यांनी थेट एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे स्पष्टीकरणाची मागणी केली होती.
या ऑडिओ क्लिपवरून सध्या भाजप आणि शिवसेनेत मोठा वाद निर्माण झाला आहे. ही क्लिप नेमकी कोणी बाहेर आणली आणि भाजपशी संबंधित लोक श्रीकांत शिंदे यांच्याविषयी असे कसे बोलू शकतात, असा सवाल शिवसेना नेत्यांनी उपस्थित केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- लाडकी बहीण योजनेनंतर आता एकल महिलांसाठी नवीन योजना; १२ लाख जणींना मिळणार आर्थिक आधार
- मुंढवा जमीन घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेकडून पार्थ पवार यांना नोटीस
- एपस्टीन फाइल्सचा भारताच्या राजकारणावर परिणाम होणार, ट्रम्प यांचा पराभव निश्चित; पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
Quick Answers
मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान भाजपने मनोज जरांगे पाटील यांना दिलेले ५०० कोटी रुपये खासदार श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्यापर्यंत पोहोचवले, असा दावा त्या ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आला होता.
ते ५०० कोटी रुपये आपल्यापर्यंतही पोहोचलेले नाहीत आणि मनोज जरांगे पाटील यांच्याप्रमाणे आपल्यालाही ते पैसे कुठे गेले असा प्रश्न पडला आहे, असे श्रीकांत शिंदे म्हणाले. तसेच आपण तेच पैसे आता शोधायला चाललो आहोत, असा टोला त्यांनी लगावला.
श्रीकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
ही क्लिप समोर आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी थेट एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडे स्पष्टीकरणाची मागणी केली होती.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








