जालना, 24 ऑक्टोबर: ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपचे जाहीर प्रसारण केल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आपल्या जिवाला मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. हे अत्यंत मोठे नेटवर्क असून आपल्या घरावर कधीही हल्ला होऊ शकतो आणि आपल्याला मारण्याचे कट रचले जात आहेत, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. या क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून भाजप आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत.
ही ऑडिओ क्लिप आपण समोर आणण्यापूर्वीच व्हायरल झाली होती आणि ती रामदास कदम यांनीच व्हायरल केली, असा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. रामदास कदम यांच्याकडेच या प्रकरणाची सर्व माहिती असल्याने त्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. आपला जीव धोक्यात घालून आपण ही संपूर्ण माहिती उघड केल्याचेही ते म्हणाले.
क्लिपच्या मूळ स्रोताची सर्व हमी आणि जबाबदारी ‘मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे’ यांनी घ्यावी, असे सांगतानाच या प्रकरणापुरता आपला त्यांच्यावर विश्वास असल्याचे जरांगे म्हणाले. मात्र, त्याचवेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माणसे आपल्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केला. सरकारने आपली सुरक्षा व्यवस्था (स्कॉटिंग) काढून घेतली असून दसरा मेळाव्यालाही शेवटपर्यंत पोलिसांचे संरक्षण दिले नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
ही क्लिप ‘एआय’ (AI) जनरेटेड असल्याचा आरोप जरांगे यांनी फेटाळून लावला आहे. क्लिप ओरिजनल असल्याची सर्वांनाच खात्री असल्याचे ते म्हणाले. तसेच नवनाथ बन यांच्या आरोपांवर पलटवार करताना, रक्कम १०० कोटी का असेना, पण ते झाले की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या क्लिपबाबत एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले असले तरी, श्रीकांत शिंदे गप्प का आहेत? त्यांची चूक नसेल तर ते शांत कसे बसू शकतात, असा प्रश्नही जरांगे यांनी विचारला आहे.
दुसरीकडे, या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये भांडण लावण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. यामागे कोण आहे याची पोलिसांच्या एसआयटीने (SIT) चौकशी करावी आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना आधी उचलले पाहिजे, अशी मागणी लाड यांनी केली. संजय राऊत हेच या क्लिपचे निर्माते असल्याचा दावाही त्यांनी केला.
५०० कोटींच्या दाव्याचे आपण कधीही खंडन केले नसून या क्लिपची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल, असे लाड यांनी स्पष्ट केले. भाजपच्या एका विधानपरिषद आमदाराने ही क्लिप जरांगेंना दिल्याच्या आरोपाने आपल्याला काहीही फरक पडत नाही, चौकशी होईपर्यंत धीर धरावा, असे ते म्हणाले. दरम्यान, महायुतीतील या तणावानंतर एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांना जरांगे पाटील यांच्याविषयी न बोलण्याच्या सूचना दिल्याची माहिती समोर आली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर
- ३०० टी-२० सामने खेळणारा भारत दुसरा संघ; न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात ऐतिहासिक टप्पा
- आयपीएल २०२७ पूर्वी मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा; स्टीफन जोन्स यांची गोलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती
Quick Answers
आपल्या जिवाला मोठा धोका असून हे अत्यंत मोठे नेटवर्क आहे, घरावर कधीही हल्ला होऊ शकतो आणि आपल्याला मारण्याचे कट रचले जात आहेत, अशी भीती मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपानुसार, ही ऑडिओ क्लिप स्वतः समोर आणण्यापूर्वीच रामदास कदम यांनी व्हायरल केली होती आणि या प्रकरणाची सर्व माहिती कदम यांच्याकडे असल्याने त्यांची सखोल चौकशी व्हावी.
प्रसाद लाड यांच्या आरोपानुसार शिवसेना आणि भाजपमध्ये भांडण लावण्याचे षडयंत्र रचले जात असून, संजय राऊत हेच या क्लिपचे निर्माते आहेत. यामागे कोण आहे याची पोलिसांनी एसआयटी चौकशी करावी आणि संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.
जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार सरकारने त्यांची सुरक्षा व्यवस्था (स्कॉटिंग) काढून घेतली असून दसरा मेळाव्यालाही शेवटपर्यंत पोलिसांचे संरक्षण दिले नव्हते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








