भाजपसोबत राहायचं आणि शिव्या घालायच्या हे खपवून घेणार नाही; रामदास कदमांच्या टीकेवर दरेकरांचा पलटवार

रामदास कदम यांच्या टीकेवर प्रविण दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, भाजपसोबत राहून शिव्या देणे खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Published On: 

Pravin Darekar criticizing Ramdas Kadam over audio clip issue

प्रतिनिधी, 23 ऑक्टोबर: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपवरून राजकीय वातावरण तापले आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर केलेल्या टीकेला भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. भाजपसोबत राहायचे आणि दुसरीकडे शिव्या द्यायच्या, हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा दरेकर यांनी दिला. खालच्या पातळीवर जाऊन आरोप केल्यास आम्ही गप्प बसणार नाही आणि आम्ही काही लेचेपेचे नाही, असे ते म्हणाले.

कोणी कोणाच्या सुपाऱ्या घेतल्या आहेत, हे संपूर्ण जगाला माहीत असून आगामी काळात ते समोर येईल. रामदास भाईंनी सुपाऱ्यांबाबत बोलावे, कारण त्यांचा तसा इतिहासच आहे, अशी बोचरी टीका दरेकर यांनी केली. असे जाहीर वादविवाद शोभा देणारे नसून, महायुतीत तणाव निर्माण करून एकनाथ शिंदे यांनाच त्रास दिला जात आहे. जे काही असेल ते चार भिंतीत बसून सोडवता येईल, पण आम्हाला आव्हान दिल्यास भाजप जशास तसे प्रतिआव्हान देईल, असे त्यांनी ठणकावून सांगितले.

या सर्व प्रकाराचा महायुतीवर परिणाम होऊ शकतो, असे सांगत दरेकर यांनी कदम यांना टोला लगावला. तुमचा एक मुलगा उद्या कॅबिनेटमध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या मुलाचेही चांगले होईल, तुम्हीही काहीतरी पद घ्या. पण आम्ही नसू तर भाजप संपून जाईल असे नाही. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, केवळ मला वाटले म्हणून कोणी मुख्यमंत्री होत नसतो, त्यासाठी आकडेवारी महत्त्वाची असते, असे दरेकर म्हणाले.

ऑडिओ क्लिपबाबत बोलताना दरेकरांनी स्पष्ट केले की, प्रसाद लाड हे केवळ आंदोलन सोडवण्यासाठी गेले होते. लाड यांचा फोटो दाखवला जात असला तरी, काळकुटे यांचे अनेक होर्डिंग शिंदे साहेबांसोबत दिसत असल्याचे दरेकर म्हणाले. जरांगे पाटील यांच्या बैठका लाईव्ह असतात, त्यामुळे यात आपली पोळी भाजून घेणे योग्य नाही. स्वतः शिंदे साहेबांनी ५०० कोटी रुपये दिलेही नाहीत आणि घेतलेही नाहीत असे स्पष्ट केले असून हे केवळ संभाषण आहे. तपास यंत्रणा या क्लिपची चौकशी करतील आणि सर्व सत्य समोर येईल.

चौकशी होण्याआधीच महायुतीत तणाव निर्माण करणे आणि केवळ भाजपवर तुटून पडणे चुकीचे आहे. जरांगे पाटील राजकीय हेतूने वाद निर्माण करत आहेत, असे आपल्याला वाटत नसल्याचेही ते म्हणाले. आशिष शेलार यांच्यासारख्या जबाबदार नेत्याने भाजपचा याच्याशी संबंध नसल्याचे सांगितल्यावर त्यावर विश्वास ठेवायला हवा. मात्र, शिवसेना नेत्यांची वक्तव्ये पाहता यात आपली पाल चुकचुकत असल्याचे त्यांनी नमूद केले.

महायुतीमध्ये समन्वय समिती असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये संवाद आहे. उदय सामंत यांच्यासारखे जबाबदार नेते थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात. त्यामुळे माध्यमांमधून टाहो फोडण्यापेक्षा समन्वयातून निराकरण झाले पाहिजे. ज्यांना समज आहे त्यांनी तारतम्य बाळगले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. एकनाथ शिंदे काही विरोधी पक्षात नाहीत की त्यांना घाबरावे. त्यामुळे लहान मुलांसारखे बोलणे चुकीचे असल्याचे दरेकर यांनी शेवटी स्पष्ट केले.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

भाजपसोबत राहायचे आणि दुसरीकडे शिव्या द्यायच्या, हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा प्रविण दरेकर यांनी दिला. तसेच खालच्या पातळीवर जाऊन आरोप केल्यास भाजप गप्प बसणार नाही आणि आव्हान दिल्यास जशास तसे प्रतिआव्हान देईल, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही