ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावे; ५०० कोटींच्या आरोपांवर उदय सामंतांची थेट मागणी

मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपशी संबंधित व्यक्तींची नावे असल्याने, या षडयंत्राची एसआयटी आणि फॉरेन्सिकमार्फत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली.

Published On: 

Chitrapat Mahamandal Election: उदय सामंत यांचा संताप!

कोल्हापूर, 22 ऑक्टोबर: मनोज जरांगे पाटील यांनी व्हायरल केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपशी संबंधित लोकांची नावे असून, ही क्लिप खरी असल्यास भाजपने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी थेट मागणी शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.

या ऑडिओ क्लिपमध्ये एका महिलेने ‘खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ५०० कोटी रुपये दिले’, असा खळबळजनक दावा केला आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि स्वतः मनोज जरांगे यांनी असे कोणतेही पैसे दिले किंवा घेतले नसल्याचे स्पष्ट केले आहे. पैसे देण्या-घेण्याचा विषय कालच संपलेला असतानाही, अशा क्लिपमधून जाणीवपूर्वक बदनामीचे षडयंत्र रचले जात असल्याचे सामंत म्हणाले.

यामागे एकनाथ शिंदे, डॉ. श्रीकांत शिंदे आणि पर्यायाने शिवसेनेला बदनाम करण्याचा मोठा कट असल्याचा आरोप सामंत यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचे आंदोलन अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले होते. ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. असे असतानाही दोन समाजांत आणि भाजप-शिवसेना या मित्रपक्षांमध्ये तेढ निर्माण करण्यासाठी ही क्लिप व्हायरल केल्याचा दावा त्यांनी केला.

क्लिपमध्ये केवळ ५०० कोटींचा उल्लेख नाही, तर आंदोलन कसे थांबवायचे आणि गाड्यांची व्यवस्था कशी करायची याबाबतचे संभाषणही आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा याच्याशी काहीही संबंध नसताना केवळ शिवसेनेची बदनामी करण्यासाठी त्यांचे नाव गोवले गेले आहे. त्यामुळे हे सर्व संभाषण कुणी रेकॉर्ड केले आणि कोणत्या उद्देशाने व्हायरल केले, याची एसआयटी (SIT), सायबर आणि फॉरेन्सिक लॅबमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सामंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने केली आहे. क्लिपमधील आवाज नेमके कोणाचे आहेत, हे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ होऊन जनतेसमोर आलेच पाहिजे, असेही ते म्हणाले.

भाजप नेत्यांना अंधारात ठेवून त्यांच्याच पक्षाशी संबंधित काही लोक हे कृत्य करत आहेत का, असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे किंवा मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अपरोक्ष या गोष्टी होत आहेत का, याची भारतीय जनता पार्टीने पक्षपातळीवर चौकशी केली पाहिजे. पोलीस, सायबर, फॉरेन्सिक आणि पक्ष अशा चारही स्तरांवर या प्रकरणाचा तपास होणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.

महायुती सरकारमध्ये मित्रपक्षाच्या नेत्यांबद्दल असे गैरसमज पसरवणे अत्यंत दुर्दैवी आहे. या गंभीर प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितली असून, शिवसेनेचे मुंबईतील खासदार आणि आमदारांचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपशी संबंधित लोकांची नावे असून, ही क्लिप खरी असल्यास भाजपने याबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी थेट मागणी उदय सामंत यांनी केली आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही