शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल तर…; रामदास आठवलेंनी मोठी अट घालत थेट सत्तेचं गणितच मांडलं!

एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्यांना भाजपपेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागतील, असे स्पष्ट करत रामदास आठवले यांनी सत्तेचे समीकरण मांडले आहे.

Published On: 

eknath Shinde Gat Mumbai Mayor strategy

प्रतिनिधी, 22 ऑक्टोबर: एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्यांच्या पक्षाला भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागतील, अशी स्पष्ट अट केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर आठवले यांनी थेट सत्तेचे गणित उलगडून दाखवले आहे.

रामदास आठवले म्हणाले की, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या समर्थकांची आणि नेत्यांची इच्छा असणे साहजिक आहे. यासाठी ते भाजपपेक्षा अधिक जागा जिंकण्याची अपेक्षा करत असतील, तर ती चांगली गोष्ट आहे. शिंदे यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. रिक्षा चालवण्यापासून ते शिवसेनेच्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय असल्याचेही आठवले यांनी नमूद केले. भाजपनेच त्यांना अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिले होते, असेही ते म्हणाले.

महायुतीमध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करत आठवले यांनी सध्याच्या सत्तेचे समीकरण सांगितले. ते म्हणाले की, भाजपने १३२ जागा जिंकल्या आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला ५७ जागा मिळाल्या, म्हणूनच आज देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ‘अमित शाह हेच खरे बिश्नोई आहेत’ असे विधान केले होते. यावरही आठवले यांनी जोरदार टीका केली. देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते असलेल्या अमित शाह यांची तुलना बिश्नोई यांच्याशी करणे पूर्णपणे चुकीचे आणि अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले. राऊत नेहमीच अशी निराधार विधाने करत असतात. आपले सरकार येणार असे ते २०२४ मध्येही सांगत होते आणि आजही तेच म्हणत आहेत, असा टोला रामदास आठवले यांनी लगावला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मते, एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्यांच्या पक्षाला भारतीय जनता पक्षापेक्षा जास्त जागा जिंकाव्या लागतील.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही