मोठ्या नेत्यांवर आरोप करताना विचार करा, शिंदेंचे महत्त्व कमी होणार नाही : नरेश म्हस्के

मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या ५०० कोटींच्या आरोपांवर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर देत मोठ्या नेत्यांवर आरोप करताना विचार करण्याचा सल्ला दिला.

Published On: 

Manoj Jarange Patil and Ramdas Kadam speaking on recent political allegations

प्रतिनिधी, 20 ऑक्टोबर: शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांना मोठ्या नेत्यांवर आरोप करताना, मत व्यक्त करताना विचार करण्याचा सल्ला दिला आहे. एकनाथ शिंदे हे मातीशी नाळ जुळलेले आणि जनसामान्यांचे नेते असून त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून राजकारणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना टार्गेट करण्याचा कोणी कितीही प्रयत्न केला, तरी लोकांच्या मनातील शिंदे साहेबांचे स्थान कुठेही कमी होणार नाही, असा विश्वास म्हस्के यांनी व्यक्त केला आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये पोहोचवल्याचे तुम्ही दिल्लीत भाजप नेत्यांना खोटे सांगितले का? असा सवाल जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना विचारला होता. तसेच, जर पैसे दिले नसतील तर भाजप तुम्हाला संपवत आहे की तुम्ही मला संपवत आहात, याचा छडा लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला होता. यावर उत्तर देताना म्हस्के म्हणाले की, यामध्ये कोणालाही संपवण्याचा विषय नाही. जरांगे हे मराठा समाजाचे नेते असल्याने आम्ही त्यांचा आदर करतो. आम्हीसुद्धा मराठा समाजातच काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जरांगे यांनी केलेल्या वक्तव्याचा आपण अभ्यास करून मगच सविस्तर उत्तर देऊ, असेही म्हस्के म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी केलेले काम खुद्द मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा समाजाने यापूर्वी मान्य केले असल्याचे म्हस्के यांनी निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यावरही राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आज दसरा हा दुर्जनांचा नाश करण्याचा दिवस असल्याचे सांगत त्यांनी जरांगे यांना दसरा आणि आगामी दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.

शिवसेना ही केवळ राजकारणासाठी जन्मलेली नसून ती काम करणारी संघटना असल्याचे म्हस्के यांनी स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ या मंत्राचे एकनाथ शिंदे तंतोतंत पालन करत आहेत. दुष्काळग्रस्त भागातील आपला अन्नदाता असलेल्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावे आणि त्यांची दिवाळी चांगली व्हावी, यासाठी सरकारसोबतच पक्षाची जबाबदारी म्हणून एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून आमचे शिवसैनिक थेट शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन मदत देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, विरोधकांकडून ज्या पद्धतीने राज्याचे ‘यूपी, बिहार’ झाल्याची टीका केली जात होती, त्याला राज्य सरकारने चोख उत्तर दिले आहे. टायगर श्रॉफच्या आरोपींना पकडण्यात आले असल्याचे नमूद करत नरेश म्हस्के यांनी विरोधकांवर पलटवार केला.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

नरेश म्हस्के यांनी मनोज जरांगे पाटील यांना मोठ्या नेत्यांवर आरोप करताना आणि मत व्यक्त करताना विचार करण्याचा सल्ला दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही