मुंबई, 20 ऑक्टोबर: राज्यात सध्या साडेतीनशेहून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे गट) दसरा मेळाव्यात बळीराजाला दिलासा देणारे बॅनर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
या मेळाव्यात लावण्यात आलेल्या बॅनरवर खास संदेश देण्यात आले. “शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणीही सुखी राहू शकत नाही. शेतकऱ्यांच्या वेदना मला माहीत आहेत कारण मी देखील शेतकऱ्यांचा मुलगा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे,” असा मजकूर यावर झळकला. तसेच, “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असे ठोस आश्वासनही यातून देण्यात आले.
केवळ शब्दांचा आधार न देता कृतीतूनही मदत दाखवण्याचा प्रयत्न यावेळी झाला. मेळाव्याच्या ठिकाणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन आलेले ट्रकही उपस्थित होते. याशिवाय “मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण” आणि “शेतकऱ्यांनो धीर सोडू नका, तुमचे भाऊ तुमच्या पाठीशी उभे आहेत,” असे भावनिक संदेशही बॅनरच्या माध्यमातून देण्यात आले.
स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवून घेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने बळीराजाला मोठा धीर देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे. राज्यावर दुष्काळाचे सावट असताना, आजच्या या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी नेमकी कोणती मोठी घोषणा करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्यांना २०२९ ला पाडणार; नारायणगडावरून मनोज जरांगेंचा इशारा
- बीडच्या नारायण गडावरून मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचा बॉम्ब; श्रीकांत शिंदेंचाही उल्लेख
- दसरा मेळाव्यापूर्वीच ठाकरे गटात मतभेद; राऊतांच्या अल्बानियाबाबतच्या विधानावर प्रियंका चतुर्वेदींचा थेट आक्षेप
Quick Answers
हा दसरा मेळावा मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को मैदानावर पार पडला.
बॅनर्सवर “शेतकऱ्यांना दुःखी ठेवून कोणीही सुखी राहू शकत नाही. शेतकऱ्यांच्या वेदना मला माहीत आहेत कारण मी देखील शेतकऱ्यांचा मुलगा आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे” आणि “शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही,” असे संदेश देण्यात आले होते.
मेळाव्याच्या ठिकाणी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिवाळीचा शिधा घेऊन आलेले ट्रक उपस्थित होते.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








