प्रतिनिधी, 20 ऑक्टोबर: राज्याच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्रीपदावरून मोठ्या घडामोडींचे संकेत मिळत आहेत. दसरा मेळाव्याच्या तोंडावर शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर दराडे या तीन प्रमुख नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
माध्यमांशी संवाद साधताना प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, सध्या संख्याबळ कमी असल्याने एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. मात्र, आगामी काळात संख्याबळ वाढवून आपण शिंदेंना मुख्यमंत्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गुलाबराव पाटील यांनीही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, हीच प्रत्येक आमदाराची भावना असल्याचे म्हटले आहे.
आमदार किशोर दराडे यांनीही या मागणीला दुजोरा दिला आहे. शिंदेंनी (Eknath Shinde) मुख्यमंत्री व्हावे अशी सर्वांचीच इच्छा असली तरी, त्यांना मुख्यमंत्री करायचे की नाही हे शेवटी आमदारांच्या हातात असल्याचे दराडे म्हणाले. विधानसभा निवडणुकांना अद्याप वेळ असतानाही, एकाच दिवशी तीन नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत थेट विधाने केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका टीकेलाही प्रताप सरनाईक यांनी उत्तर दिले. टायगर श्रॉफवर हल्ला झाल्यावर शिंदेंनी त्याची भेट घेतली, मात्र प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटायला शिंदेंना वेळ मिळाला नाही, असा संताप राऊत यांनी व्यक्त केला होता.
यावर स्पष्टीकरण देताना सरनाईक म्हणाले की, हत्येच्या वेळी एकनाथ शिंदे बाहेर होते. मात्र, शिंदेंच्याच आदेशावरून आपण पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे आणि शिंदेंचे फोनवरून बोलणे करून दिले होते. विरोधक जाणीवपूर्वक राजकारण करत असल्याचा आरोप करत, घरात बसून टीका करण्यापेक्षा विरोधकांनी हिंमत असेल तर प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना मदत करावी, असे आव्हान सरनाईक यांनी दिले.
तसेच, जितेंद्र आव्हाड यांना येणाऱ्या धमक्यांबाबतही सरनाईक यांनी भाष्य केले. आव्हाडांनाच वारंवार धमक्या का येतात, असा सवाल उपस्थित करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. गरज भासल्यास आव्हाड यांची सुरक्षा वाढवण्यात यावी, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित शर्माने मानले माजी निवड समिती अध्यक्षांचे आभार; कठीण काळात दिली होती साथ
- सतेज पाटलांचा गोकुळमधील विजय हीच ‘रिजीम चेंज’ची सुरुवात; संजय राऊतांचा मोठा दावा, मोहन भागवतांच्या वक्तव्यावरही पलटवार
- महायुतीत आपल्याला गृहीत धरलं जातंय, अजितदादांच्या उल्लेखासह मंत्री मकरंद पाटलांनी व्यक्त केली खदखद
Quick Answers
शिंदे गटाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार किशोर दराडे या तीन नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
सध्या संख्याबळ कमी असल्यामुळे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, मात्र आगामी काळात संख्याबळ वाढवून आपण त्यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले आहे.
हत्येच्या वेळी एकनाथ शिंदे बाहेर होते, परंतु त्यांच्याच आदेशावरून आपण पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन शिंदेंसोबत फोनवर बोलणे करून दिले होते, असे स्पष्टीकरण प्रताप सरनाईक यांनी दिले.
आव्हाडांनाच वारंवार धमक्या का येतात असा सवाल करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि गरज भासल्यास त्यांची सुरक्षा वाढवण्यात यावी, अशी मागणी सरनाईक यांनी केली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






