गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट: फेरमतमोजणीत आकडे फिरले, सतेज पाटलांना धक्का मात्र सत्ता निश्चित

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील गटाला १३, तर महायुतीला १२ जागांवर विजय. फेरमतमोजणीत सतेज पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 19 ऑक्टोबर: कोल्हापुरातील गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी मोठा ट्विस्ट आला आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला १५ जागांवर आघाडीवर असलेल्या सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला अंतिम निकालात १३ जागांवर विजय मिळवता आला. तर दुसरीकडे, महायुतीचे समर्थन असलेल्या १२ उमेदवारांनी बाजी मारली आहे.

एका जागेसाठी पुन्हा मतमोजणी करण्यात आल्याने हा बदल पाहायला मिळाला. या फेरमतमोजणीनंतर सतेज पाटील यांच्या पॅनेलचे उमेदवार सचिन घोरपडे यांचा पराभव झाला. तर, महायुतीचे उमेदवार अमर पाटील यांनी विजय मिळवला. यामुळे सतेज पाटील यांच्या पॅनेलची एक जागा कमी झाली असून महायुतीची एक जागा वाढली आहे.

आपल्या पॅनेलच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर सतेज पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "मतमोजणीला मुद्दामहून उशीर केला जातोय," असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. एका जागेवर धक्का बसला असला तरी, सत्तेत बसण्यासाठी लागणारा जादुई आकडा सतेज पाटील यांच्या गटाने गाठला आहे. त्यामुळे यापुढे गोकुळचा कारभार तेच हाकणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीकडून अभिजित तायशेटे, शशिकांत पाटील चुयेकर, किसन चौगले, बाबासाहेब चौगले, राहुल देसाई, विद्याधर गुरबे, बाबासाहेब देवकर, विश्वजीत जाधव, अंजना रेडेकर, भाग्यश्री डोंगळे, शशिकांत खोत, राजू बाबा आवळे आणि बयाजी शेळके या १३ उमेदवारांनी विजय नोंदवला.

तर महायुतीकडून राहुल पाटील, चेतन नरके, अजित नरके, अंबरीषसिंह घाटगे, विरेंद्र मंडलिक, मदन देसाई, राजेश पाटील, रणजितसिंह दिलीपराव पाटील, रणजितसिंह कृष्णराव पाटील, अजित पांडुरंग पाटील, कर्णसिह गायकवाड आणि अमर पाटील (कोडोली) अशा एकूण १२ उमेदवारांचा विजय झाला आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

अंतिम निकालात सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीला १३ जागांवर विजय मिळाला, तर महायुतीचे समर्थन असलेल्या १२ उमेदवारांनी बाजी मारली.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही