कोल्हापूर, 19 ऑक्टोबर: कोल्हापूरच्या राजकारणात दबदबा असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून गोकुळवर वर्चस्व असलेल्या महाडिक गटाला बाजूला सारत काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने सत्ता खेचून आणली आहे. या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाचा पराभव झाला असून, भाजप नेत्या आणि विद्यमान संचालिका शौमिका महाडिक यांनाही निसटता पराभव पत्करावा लागला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या आणि अनेक मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत १०० टक्के मतदान झाले होते. महायुतीप्रणीत छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या शौमिका महाडिक यांचा केवळ ७ मतांनी पराभव झाला. त्यांच्या विरोधात सतेज पाटील यांच्या आघाडीकडून राजू जयवंतराव आवळे रिंगणात होते. या निकालानंतर शौमिका महाडिक यांनी मतमोजणीची (रिकाऊंटिंग) मागणी केली असून, पुढील काही तासांत अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
शौमिका महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा आणि राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या भावजय आहेत. त्या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा असून, त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि सदस्यपदही भूषवले आहे. गोकुळच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव महाडिक कुटुंबासह भाजप आणि महायुतीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
२०२२ मध्ये झालेल्या गोकुळच्या गेल्या निवडणुकीत शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील आणि मुश्रीफ गटाच्या उमेदवार अंजना केदारी रेडेकर यांचा ४३ मतांनी पराभव केला होता. त्या वेळी त्या पहिल्यांदाच गोकुळच्या संचालक म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र, यंदा सतेज पाटील विरुद्ध महायुती असा थेट सामना रंगल्याने राजकीय समीकरणे बदलली आणि त्यात महाडिक यांना पराभवाचा सामना करावा लागला.
📌 महत्वाच्या बातम्या
- मोहम्मद कैफकडून भुवनेश्वर कुमारची जसप्रीत बुमराहशी तुलना; म्हणाला, ‘विश्वचषकातील पराभवानंतर त्याला बळीचा बकरा बनवलं’
- प्रज्ञान ओझा बीसीसीआय निवड समितीचे नवे अध्यक्ष; रमेश पोवार यांचीही समितीत एन्ट्री
- खांद्याच्या दुखापतीदरम्यान गौतम गंभीरचा सल्ला; नवीन-उल-हकने केला मोठा खुलासा
Quick Answers
काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सत्ता मिळवली आहे.
शौमिका महाडिक यांचा केवळ ७ मतांनी पराभव झाला. त्यांच्या विरोधात सतेज पाटील यांच्या आघाडीकडून राजू जयवंतराव आवळे रिंगणात होते.
२०२२ मधील निवडणुकीत शौमिका महाडिक यांनी सतेज पाटील आणि मुश्रीफ गटाच्या उमेदवार अंजना केदारी रेडेकर यांचा ४३ मतांनी पराभव केला होता.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






