पुणे, 15 ऑक्टोबर: अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात २० टक्के पाणीकपात लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी आणि त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही घोषणा केली आहे.
यंदा राज्यात पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. राज्यातील प्रमुख शहरांसह अनेक तालुके आणि जिल्ह्यांमध्ये पाणीकपातीचे धोरण जाहीर करण्यात आले आहे. राज्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातील पाण्याचा आढावा घेऊन २० टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, पुणे महापालिकेने यापूर्वीच शहरातील पाणीपुरवठ्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता शहरात दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.
पुढील वर्षभरासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन व्हावे आणि पाणीटंचाईचा धोका कमी व्हावा, या उद्देशाने महापालिकेने हा निर्णय घेतला होता. पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने पुणेकरांच्या दैनंदिन जीवनावर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यातच आता जिल्हा स्तरावरही २० टक्के पाणीकपात लागू झाल्यामुळे नागरिकांनी पाण्याची नासाडी करू नये आणि पाण्याचा अतिशय जपून वापर करावा, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिनेता इम्रान खानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची FRRO ची नोटीस; उच्च न्यायालयात घेतली धाव
- कॅमेरून ग्रीनच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट; दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता
- प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना शिंदेंनी कोणतं काम दिलं हे उघड; संजय राऊतांचा थेट आरोप
Quick Answers
पुणे जिल्ह्यात २० टक्के पाणीकपात लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
उपलब्ध पाणीसाठा पुढील पावसाळ्यापर्यंत पुरवण्यासाठी आणि त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही घोषणा केली आहे.
पुणे महापालिकेच्या निर्णयानुसार शहरात आता दर गुरुवारी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असून याची अंमलबजावणी १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







