प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात असून त्यांच्या चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाचे स्मरण केले जात आहे. मात्र, दुसरीकडे अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या निधनाला ‘राक्षसाचा मृत्यू’ असे संबोधत त्यांच्यावर दररोज टीका करणे सुरू ठेवले आहे. तिच्या या वक्तव्यांमुळे नानांच्या चाहत्यांकडून संताप व्यक्त होत असतानाच, आता नानांचा मुलगा मल्हार पाटेकर याने या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत मल्हार पाटेकर यांनी तनुश्रीच्या आरोपांचा समाचार घेतला. कोणाचेही थेट नाव न घेता मल्हार यांनी स्पष्ट केले की, लोक ज्या प्रकरणावर वारंवार बोलत आहेत, ते न्यायालयाने आधीच निकाली काढले आहे. हे प्रकरण केव्हाच संपले असतानाही लोक त्यावर अकारण भाष्य करत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
आपल्या वडिलांची बदनामी करणाऱ्यांना उद्देशून मल्हार यांनी आपली भूमिका अत्यंत संयमीपणे मांडली. ते म्हणाले, “जे लोक माझ्या वडिलांची बदनामी करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की जे सत्य आहे, तेच कायम राहील. देव तुमचं भलं करो.” सत्य नेहमीच टिकून राहते, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या मुलाखतीत मल्हार यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देत कुटुंबाच्या एकजुटीवरही भर दिला. कोणत्याही संकटात खंबीरपणे कसे उभे राहायचे, याची शिकवण आपल्याला आई-वडिलांकडून मिळाल्याचे ते म्हणाले. बाहेरच्या लोकांना काय वाटते याने काही फरक पडत नाही, कारण आमचे कुटुंब, काका आणि चुलत भाऊ सर्वजण भावनिकदृष्ट्या एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. आयुष्यात सर्वांचे प्रेम मिळाल्याची बाब आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची असल्याचे मल्हार यांनी आवर्जून नमूद केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेत प्रवेश केल्याचा इन्कार, पण एकनाथ शिंदेंना मानले ‘बॉस’; MIM च्या युनुस शेख यांची नक्की भूमिका काय?
- कसोटीत पुनरागमनावर झालेल्या टीकेला निक मॅडिन्सनचे सडेतोड उत्तर
- पुणेकरांनो पाणी जपून वापरा! जिल्ह्यात २० टक्के पाणीकपातीचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
Quick Answers
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या निधनाला 'राक्षसाचा मृत्यू' असे संबोधत त्यांच्यावर दररोज टीका करणे सुरू ठेवले आहे.
मल्हार पाटेकर यांनी कोणाचेही थेट नाव न घेता स्पष्ट केले की, लोक ज्या प्रकरणावर वारंवार बोलत आहेत, ते न्यायालयाने आधीच निकाली काढले आहे. तसेच हे प्रकरण संपले असताना लोक अकारण भाष्य करत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
वडिलांची बदनामी करणाऱ्यांना उद्देशून मल्हार म्हणाले, "जे लोक माझ्या वडिलांची बदनामी करत आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की जे सत्य आहे, तेच कायम राहील. देव तुमचं भलं करो."
कोणत्याही संकटात खंबीरपणे कसे उभे राहायचे, याची शिकवण आपल्याला आई-वडिलांकडून मिळाल्याचे मल्हार पाटेकर यांनी सांगितले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








