प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना शिंदेंनी कोणतं काम दिलं हे उघड; संजय राऊतांचा थेट आरोप

प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांना राजेंद्र आणि मिनाक्षी शिंदे यांनीच काम दिल्याचा थेट आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Published On: 

Shivsena Sanjay Raut criticizes BJP

प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: ठाण्यातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांनी मारेकऱ्यांना ओळखत असल्याची कबुली नुकतीच पोलिसांना दिली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी, आरोपी काम मागायला नगरसेविकेकडे जायचे, मग त्यांनी आरोपींना काय काम दिले हे आपण पाहत आहोत, असा थेट आरोप केला.

बुधवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी पोलिसांच्या तपासावर आपले बारीक लक्ष असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, “राजेंद्र शिंदे यांच्या म्हणण्यानुसार आरोपी काम मागायला नगरसेविकेकडे यायचे. यांनीच मग आरोपींना काम दिले ना आणि ते कोणते काम होते हे समोर आले आहे. ज्या दिवशी पोलिसांची चौकशी पूर्ण होईल आणि मुख्य आरोपीला संरक्षण दिले जाईल, त्या दिवशी आम्ही आमचे हत्यार बाहेर काढू.”

या प्रकरणाच्या तपासासाठी मंगळवारी ठाणे गुन्हे शाखेने राजेंद्र शिंदे यांना बोलावून तब्बल नऊ तास त्यांची कसून चौकशी केली. यावेळी त्यांना आणि अटकेत असलेल्या पाचही मारेकऱ्यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. माझी पत्नी या परिसरातील ज्येष्ठ नगरसेविका असल्याने हे पाचही आरोपी आपल्याकडे काम मागण्यासाठी यायचे आणि त्यामुळे त्यांच्याशी भेटीगाठी व्हायच्या, असा जबाब शिंदे यांनी पोलिसांना दिला. आपण त्यांना ओळखत असलो तरी पूर्णेकर यांच्या हत्येशी आपला कोणताही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला. नऊ तासांच्या चौकशीनंतर पोलिसांनी त्यांना सोडले असले तरी, आरोपींशी ओळख असल्याने त्यांना पुन्हा बोलावले जाण्याची शक्यता आहे. तसेच, मिनाक्षी शिंदे यांचीही चौकशी होऊ शकते.

प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगर येथील कार्यालयात हत्या झाली होती. पाच जणांनी कार्यालयात घुसून गोळीबार केला आणि त्यानंतर कोयत्याने वार करून त्यांचा जीव घेतला. या घटनेनंतर पूर्णेकर यांचा मुलगा राम आणि भाऊ जयनाथ यांनी शिंदे दांपत्यावर कट रचल्याचा आरोप केला होता. गणपती विसर्जनादरम्यान राजेंद्र शिंदे आणि मारेकरी हे निळकंठ इमारतीबाहेर एकत्र दिसले होते आणि याच इमारतीत हत्येचा कट आखण्यात आल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला होता. आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

प्रदीप पूर्णेकर यांची २९ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगर येथील कार्यालयात हत्या झाली होती.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही