प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: किल्ले राजगडावर एका ३० वर्षीय हौशी गिर्यारोहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (१० ऑक्टोबर) घडली. या दुःखद प्रसंगात मृत तरुणाच्या पाळीव कुत्र्याने दाखवलेली स्वामीनिष्ठा पाहून उपस्थित गिर्यारोहक आणि पर्यटकांचे डोळे पाणावले.
जिज्ञेश सदाशिव खांडाळकर (वय ३०) असे मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. ते राजगड पाहण्यासाठी आले होते. गड चढल्यानंतर त्यांना अचानक थकवा जाणवू लागला. दरदरून घाम आल्यामुळे ते विश्रांतीसाठी एका दगडावर बसले. मात्र, काही वेळातच त्यांची प्रकृती अधिकच बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला.
या प्रवासात जिज्ञेश यांच्यासोबत त्यांचा पाळीव कुत्राही होता. आपल्या मालकाला काहीतरी त्रास होत असल्याचे या मुक्या प्राण्याला जाणवले. मालकाचा मृत्यू झाल्यानंतरही या कुत्र्याने शेवटपर्यंत त्यांची साथ सोडली नाही.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिज्ञेश यांचा मृतदेह गडावरून खाली आणण्यात येत होता. त्यावेळी हा पाळीव कुत्राही मृतदेहाच्या सोबत सतत चालत राहिला. मालकाला सोडून जाण्याची कल्पनाही न शिवलेल्या या मुक्या जीवाची इमानदारी पाहून गडावरील सर्वांचेच मन हेलावून गेले.
📌 महत्वाच्या बातम्या
- नाना पाटेकर फटकळ स्वभावाचे होते, त्याचा अनुभव मलाही आला…; शोकसभेत वर्षा उसगांवकर भावूक
- आयपीएलमध्ये मोठा ट्रेड: १०.७५ कोटींचा नटराजन पुन्हा हैदराबादमध्ये, दिल्ली कॅपिटल्सने कोणाला घेतले?
- राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा; ६३५ गावे अन् २४४७ वाड्यांना टँकरने पाणी, मराठवाड्याची सर्वाधिक होरपळ
Quick Answers
किल्ले राजगडावर मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव जिज्ञेश सदाशिव खांडाळकर (वय ३०) असे आहे.
जिज्ञेश खांडाळकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने जिज्ञेश यांचा मृतदेह गडावरून खाली आणला जात असताना त्यांचा पाळीव कुत्राही मृतदेहाच्या सोबत सतत चालत राहिला.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.






