प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: ‘कुछ-कुछ होता है’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानच्या एका हट्टामुळे दिग्दर्शक करण जोहरला चक्क रडू कोसळले होते. सलमान खान ‘कॉफी विथ करण’च्या शेवटच्या सीझनच्या पहिल्या भागात पाहुणा म्हणून आला असताना, सेटवरील या जुन्या किस्स्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
करण जोहरने ‘कुछ-कुछ होता है’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत होते, तर सलमान खानने ‘अमन’ या पात्राची छोटी पण प्रभावी भूमिका (कॅमिओ) साकारली होती. अमनच्या भूमिकेने प्रेक्षकांवर वेगळी छाप उमटवली होती आणि चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती.
चित्रपटातील ‘साजन जी घर आए’ या गाण्याचे शूटिंग सुरू होते. काजोलने या गाण्यासाठी भारी लेहेंगा घातला होता आणि सेटही अत्यंत भव्य होता. करणने सलमानसाठी एक खास सूट तयार ठेवला होता. मात्र, सलमान खान चक्क फाटलेली जीन्स आणि काळा टी-शर्ट घालून सेटवर पोहोचला. त्याला त्याच कपड्यांमध्ये गाणे शूट करायचे होते. ‘आत्तापर्यंत कोणताही वर फाटलेली जीन्स घालून आलेला नाही, त्यामुळे असा ट्रेंड मला बनवायचा आहे,’ असा सलमानचा हट्ट होता.
त्यावेळी करण जोहर नवखा दिग्दर्शक होता. “मी तेव्हा सलमानला खूप घाबरत होतो आणि आजही घाबरतोच,” असे करणने मुलाखतीत सांगितले होते. सलमानचा तो हट्ट ऐकून आपले ब्लड प्रेशर वाढत असल्याचे त्याला वाटत होते. त्याने सलमानला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी संकोचून नकार देत करण जोहर सलमानसमोर रडायला लागला.
“माझा हा पहिलाच चित्रपट आहे, कृपया सूट घाल,” अशी विनंती करणने रडत केली. त्याला रडताना पाहून सलमानने लगेच आपला निर्णय बदलला. त्याने केवळ सूट घालण्यास होकारच दिला नाही, तर करणला शांतही केले.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘सावळ्या मुली कॅमेऱ्यासमोर चांगल्या दिसत नाहीत’; पहिल्याच ऑडिशनला सोनाली कुलकर्णीला रंगावरून हिणवलं
- आंदोलनात सहभागी झाल्याने इमरान खानला देश सोडण्याची नोटीस, संजय राऊतांचा संताप; म्हणाले- अक्षय कुमारला का सांगत नाही?
- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; ट्रिस्टन स्टब्सला वगळले
Quick Answers
करण जोहरने 'कुछ-कुछ होता है' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले होते.
सलमान खानने 'कुछ-कुछ होता है' चित्रपटात 'अमन' या पात्राची छोटी पण प्रभावी कॅमिओ भूमिका साकारली होती.
'साजन जी घर आए' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने फाटलेली जीन्स आणि काळा टी-शर्ट घालून गाणे शूट करण्याचा हट्ट धरला होता.
करण जोहरला रडताना पाहून सलमान खानने लगेच आपला निर्णय बदलला, सूट घालण्यास होकार दिला आणि करणला शांत केले.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








