दिल्ली, 14 ऑक्टोबर: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या कॉकरोच जनता पार्टीने (CJP) पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी दिल्लीत नव्या मोर्चाची घोषणा केल्यामुळे राजधानीतील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सध्या दिल्लीतील जंतर-मंतर मैदान आंदोलनासाठी बंद ठेवण्यात आले असून, या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतानाही पक्षाचे नेते सैरभ दास, आशुतोष रांका आणि अजिक्य शिंदे हे त्यांच्या काही मित्रांसह या परिसरात पोहोचले होते. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत त्यांना पुन्हा ताब्यात घेतले आहे.
सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना झालेल्या या अटकेच्या निषेधार्थ अभिजीत दिपके यांनी आता ‘लेहरा दो तिरंगा मार्च’ काढण्याची मोठी घोषणा केली आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कनॉट प्लेस परिसरातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिपके यांनी केले आहे.
ज्ञानेश कुमार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी सीजेपीकडून सातत्याने जोरदार मागणी केली जात आहे. याच मागणीसाठी दिल्लीत यापूर्वी झालेल्या मोठ्या आंदोलनातही पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले होते, ज्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. आता नव्या आंदोलनाच्या घोषणेमुळे सरकारचे टेन्शन वाढण्याची चिन्हे आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- थेट निलंबित करणार! आचारसंहितेचे कारण सांगणाऱ्या अधिकाऱ्यांवर देवेंद्र फडणवीस संतापले
- समान नागरी कायद्याला विरोध केल्यास खलास करू; राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी
- अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर मोहोर
Quick Answers
कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी पक्षाचे नेते सौरभ दास, आशुतोष रांका आणि अजिंक्य शिंदे यांच्यासह त्यांच्या काही मित्रांना जंतर-मंतर परिसरातून ताब्यात घेतले.
अभिजीत दिपके यांनी पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ 'लेहरा दो तिरंगा मार्च' काढण्याची घोषणा केली आहे.
हा मोर्चा १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता कनॉट प्लेस परिसरातून सुरू होणार आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







