अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सरकारची दिवाळी भेट; प्रत्येकी २००० रुपयांची भाऊबीज जाहीर

अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी दोन हजार रुपयांची भाऊबीज दिली जाणार आहे. यासाठी ४२ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 14 ऑक्टोबर: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये देण्यात येणार आहेत. या निर्णयासाठी ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यात सध्या १,०८,६२७ अंगणवाडी सेविका आणि १,०५,४७० मदतनीस अशा एकूण २,१४,०९७ जणी कार्यरत आहेत. गरोदर महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणाची काळजी घेणाऱ्या या सेविका व मदतनीसांची दिवाळी गोड व्हावी, या उद्देशाने ही भाऊबीज देण्यात येत असल्याचे मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे, यंदा राज्यात दुष्काळाचे गंभीर सावट असून शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. ३०० हून अधिक तालुक्यांमध्ये यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता आणखी ४० तालुके दुष्काळी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या गंभीर परिस्थितीत बळीराजाला दिलासा देण्यासाठी दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपयांची अग्रीम मदत जमा केली जाणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी २,००० रुपये देण्यात येणार आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही