प्रतिनिधी, 13 ऑक्टोबर: शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महायुतीमध्ये नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकांना शिंदे यांनी सलग दांडी मारल्याने या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, हे दोन्ही नेते या बैठकीला गैरहजर राहिले.
त्यानंतर आज कचरा व्यवस्थापनासंदर्भातही आढावा बैठक ठेवण्यात आली होती. या बैठकीलाही एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. मात्र, याच वेळी त्यांच्या ‘नंदनवन’ निवासस्थानी पत्रकार परिषद असल्याने ते येऊ शकले नाहीत, असे कारण या गैरहजेरीसाठी देण्यात आले आहे.
या सलग गैरहजेरीमुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्यांना डावलले जात आहे का, आणि भाजप त्यांची ही नाराजी दूर करणार का, असे सवाल आता विचारले जात आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- निष्ठावंतांचे बंड मोडून काढत सुनेत्रा पवारांची सोमेश्वर कारखान्यात बाजी; युगेंद्र पवारांचाही पराभव
- FDA मधून बदली नाही, भेसळविरोधी कारवाई सुरूच; तुकाराम मुंढेंचा सोशल मीडियावरून खुलासा
- ऋषभ पंत दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर; बीसीसीआयने केली युवा खेळाडूची निवड
Quick Answers
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकांना एकनाथ शिंदे यांनी सलग दांडी मारल्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे.
दोन दिवसांपूर्वी 'वर्षा' निवासस्थानी दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलेले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार गैरहजर राहिले.
या बैठकीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्या 'नंदनवन' निवासस्थानी पत्रकार परिषद असल्याने ते येऊ शकले नाहीत, असे कारण देण्यात आले आहे.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









