प्रतिनिधी, 12 ऑक्टोबर: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भेटीसाठी मागितलेली वेळ देशाचे मुख्य सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी नाकारली आहे. स्पेशल इंटेंसिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रियेला विरोध आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीचे खासदार सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) धडकणार आहेत.
विरोधी पक्षांनी सरन्यायाधीशांच्या भेटीसाठी वेळ मागितल्याची माहिती काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली होती. मात्र, राहुल गांधी यांना ज्या ‘एसआयआर’च्या (SIR) मुद्द्यावर चर्चा करायची आहे, ते खटले आधीच सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहेत. त्यामुळे प्रलंबित विषयांवर चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगत सरन्यायाधीशांच्या कार्यालयाने ई-मेलद्वारे त्यांना उत्तर देत ही विनंती फेटाळून लावली.
याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना सीजेआय सूर्यकांत म्हणाले, “प्रत्येक भारतीय नागरिकाला आमच्याकडे येण्याचा अधिकार आहे. कायदा-सुव्यवस्थेचा जो विषय आहे, त्यावर आम्ही आमच्यावतीने सुनावणी करु. ज्याचा जो अधिकार आहे तो त्याला देऊ.”
📌 महत्वाच्या बातम्या
- विरोधात बोलल्याने माझ्यावर हल्ला, जरांगे पाटलांनीच सुपारी दिली; अमोल खुणेंचा गंभीर आरोप
- आदित्य आणि अमित ठाकरेंच्या अडचणीत वाढ; शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा; काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे थेट जाहीर करणार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









