पणजी, 11 ऑक्टोबर: गोव्यातील एसटी समाजाला येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत राजकीय आरक्षण (ST Reservation) मिळण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने याबाबत आश्वासन दिले असून, आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सध्या सुरू असल्याची माहिती आमदार गोविंद गावडे यांनी दिली आहे.
या आरक्षणासाठी लागणारी आवश्यक मंजुरी मिळाली असल्याचे गावडे यांनी स्पष्ट केले. कायदेशीर कार्यवाहीसाठी काही काळ लागणार असला तरी, निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. नोव्हेंबरपर्यंत आरक्षण लागू झाल्यास त्याची योग्य अंमलबजावणी करणे शक्य होईल. मात्र, आरक्षण प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच निवडणुकांची घोषणा झाल्यास त्यावेळच्या परिस्थितीनुसार पुढील दिशा ठरवली जाईल, असे त्यांनी नमूद केले. सरकार आपले आश्वासन नक्की पाळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राज्यातील एसटी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी याआधीही अनेक आंदोलने झाली आहेत. याच मुद्द्यावरून दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना गावडे म्हणाले की, संविधानाने सर्वांना आंदोलनाचा अधिकार दिला आहे. आपल्या भावना मांडण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना कोणीही रोखू शकत नाही. आता समाजाला सरकारकडून हे आश्वासन पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- MPSC Protest: ‘आंदोलनाला जामर लावाल, आंबेडकरी विचारांना नाही’; सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात
- MPSC आंदोलनातील १४ विद्यार्थ्यांवरील गुन्हे अन्यायकारक; रोहित पवारांचा आरोप
- मेट्रो, इंटरनेट सेवा पूर्ववत करा; CJP च्या आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाचे कडक निर्देश
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









