प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: ‘शादी डॉट कॉम’ या विवाह जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून मंत्रालयातील एका महिला अधिकाऱ्याची तब्बल १७ लाख ९७ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ऑनलाइन माध्यमातून जोडीदार शोधण्याची या अधिकाऱ्याची इच्छा त्यांना भलतीच महागात पडली आहे.
सीमा (नाव बदललेले) असे या पीडित महिला अधिकाऱ्याचे नाव असून, त्या मंत्रालयातील एका विभागात कार्यरत आहेत. लग्नासाठी त्यांनी ऑनलाइन संकेतस्थळावर नावनोंदणी केली होती. त्यानंतर सुनील आणि विशाल नावाच्या दोन व्यक्तींनी त्यांना लग्नासाठी इच्छुक असल्याचे सांगत संपर्क साधला.
यातील सुनील याने स्वतःला यूकेचा नागरिक असल्याचे भासवले, तर विशाल याने आपण कॅनडाचा रहिवासी असल्याची बतावणी केली. दोघांनीही सीमा यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त करत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी सीमा यांना ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडले.
या दोन्ही भामट्यांच्या भूलथापांना बळी पडून महिला अधिकाऱ्याने त्यांना एकूण १७ लाख ९७ हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट दक्षिण प्रादेशिक विभाग सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधितांविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ऑफिसमध्ये काम करताना भूक लागते? ड्रॉवरमध्ये ठेवा ‘हे’ ७ पौष्टिक स्नॅक्स
- पुढच्या निवडणुकीत कसा निवडून येतो बघतोच! रोहित पवारांचा विक्रम पाचपुतेंना अजितदादा स्टाईल इशारा
- चेहऱ्यावरील व्हाइटहेड्स काढण्यासाठी ३ सोपे घरगुती उपाय; त्वचा होईल मऊ आणि चमकदार
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









