प्रतिनिधी, 11 ऑक्टोबर: निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जंतरमंतर येथे आंदोलनाची हाक देणाऱ्या सीजेपीच्या (CJP) कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर सीजेपीचे कार्यकर्ते अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांचा पोलिसांकडून मानसिक छळ केला जात असल्याचा गंभीर आरोप अजिंक्य शिंदे यांनी केला आहे.
जंतरमंतरवर पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्यासह सीजेपीच्या शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. या तिन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले असून, सध्या त्यांना नेमके कुठे ठेवले आहे याची कोणतीही माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
अभिजीत दिपके यांच्या आजी सावित्रीबाई यांचे निधन झाले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप दिपके यांना याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, असा दावा अजिंक्य शिंदे यांनी केला आहे. आजीचे निधन होऊनही त्यांना त्यांचे वकील आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“पोलिसांकडून दिपकेंवर भावनिक अत्याचार केले जात आहेत. त्यांना विमानातून ताब्यात घेण्यात आले. या तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आले असून, आम्हाला त्यांच्या सुरक्षेबाबत मोठी चिंता आहे,” असे शिंदे यांनी पुढे सांगितले.
📌 महत्वाच्या बातम्या
- रोहित पवारांचं डोकं मेंढराच्या डागनीने डागलं पाहिजे; MPSC आंदोलनावरून गोपीचंद पडळकर संतापले
- पीएम किसानचा २४ वा हप्ता मिळवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य; पोर्टलवरही झाला मोठा बदल
- अभिजीत दीपकेंना ताब्यात घेतल्यानंतर सीजेपीच्या दिल्ली आंदोलनाची धुरा अजिंक्य शिंदेंकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे?
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.









