Share

पंचनाम्यांचे नाटक थांबवून शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करा; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारवर घणाघात

पंचनाम्यांचे नाटक बंद करून सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात एक लाख रुपये जमा करावेत आणि सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी जोरदार मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

Published On: 

Harshvardhan Sapkal targets Devendra Fadnavis

प्रतिनिधी, 10 ऑक्टोबर: राज्यामध्ये सध्या पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू असून वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. ‘देवेंद्रजी खूप अभ्यासू आहेत, पेपर संपले तरी त्यांचा अभ्यास सुरूच आहे,’ अशी टीका सपकाळ यांनी केली. यासोबतच राज्यातील दुष्काळी परिस्थितीवरूनही त्यांनी महायुती सरकारला धारेवर धरले असून, चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वच ठिकाणी पिके सुकलेली असताना नुकसानीचे पंचनामे करण्याचा खटाटोप कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सरकारला शेतकऱ्यांबद्दल पाझर फुटत नसून, ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’ अशी अवस्था असल्याची टीका सपकाळ यांनी केली. दुष्काळ जाहीर करूनही मदतीचा पत्ता नसल्याने सरकारने दिशाभूल आणि पंचनाम्यांचे नाटक बंद करावे, असे ते म्हणाले. दसऱ्याच्या आधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक लाख रुपये जमा करावेत आणि मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाप्रमाणे राज्यात सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

शेतकऱ्यांना अवघ्या आठ हजार रुपयांची मदत देणे ही क्रूर फसवणूक असल्याचे सांगत, आता फडणवीस यांना ‘फसवणीस’ म्हणण्याची वेळ आल्याचा हल्लाबोल सपकाळ यांनी केला. शेतमजुरांना सानुग्रह अनुदान द्यावे, रेशन दुकानांमधून दुप्पट धान्य उपलब्ध करावे, चारा छावण्या तातडीने सुरू कराव्यात आणि विद्यार्थ्यांची ट्युशन फी व बस पास मोफत द्यावा, या मागण्या त्यांनी लावून धरल्या. ‘जलजीवन मिशन’अंतर्गत अनेक योजना बंद पडल्या असून ती योजना आता ‘जलमरण मिशन’ झाल्याचे ते म्हणाले. तसेच, केंद्रीय पथकाची पाहणी आणि पंचनामे हा निव्वळ ‘पांचट धंदा’ चालला असून त्याचा आपण निषेध करत असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले.

कुंभमेळ्यातील सीसीटीव्ही व इतर कामांमध्ये तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या कामात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप सपकाळ यांनी केला. ‘जाऊ तिथे खाऊ’ अशी सरकारची भूमिका असून, शक्तीपीठ महामार्गात ७८ हजार कोटी रुपये गुंतवण्याऐवजी तो पैसा शेतकऱ्यांना मदतीच्या स्वरूपात द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. कुंभमेळ्यातील भ्रष्टाचाराला मर्यादा घालून तो निधीही शेतकऱ्यांसाठी वळवावा. या सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यातील कोणत्याही मंत्र्याला फिरू देणार नाही आणि प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढले जातील, असा इशारा सपकाळ यांनी दिला असून सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही