Share

MPSC पेपरफुटीच्या न्यायालयीन चौकशीची शासनाची तयारी; मात्र अध्यक्षांचा राजीनामा का? देवेंद्र फडणवीसांचा सवाल

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यास राज्य सरकार तयार आहे. मात्र, हे आंदोलन राजकीय असून न्यायालयाचा अवमान असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Published On: 

Maharashtra drought relief government decision farmer help

पालघर, 9 ऑक्टोबर: एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मात्र, या पेपरफुटीशी संबंध नसताना एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी का केली जात आहे, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. सध्या सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन हे राजकीय असून न्यायालयाचा अवमान असल्याचा दावाही त्यांनी केला.

पालघरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस यांनी एमपीएससी आंदोलनावर (MPSC Protest) सविस्तर भाष्य केले. ते म्हणाले की, जेव्हा पेपरफुटी झाली, तेव्हा भीमनराव हे एमपीएससी बोर्डाचे अध्यक्ष म्हणून रुजूही झाले नव्हते. ते नंतर या पदावर आल्यामुळे मागील घटनेसाठी त्यांचा राजीनामा कसा घेणार? राज्य सरकारला त्यांचा राजीनामा घेण्याचा अधिकार नसून तो केवळ राष्ट्रपतींना आहे. तरीही आम्ही या प्रकरणाची चौकशी करण्यास तयार आहोत आणि त्यात ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांना न्याय देण्याबाबतचे सर्व विषय शासनाने मान्य केल्याचेही त्यांनी सांगितले. उच्च न्यायालयाने हे आंदोलन बेकायदेशीर ठरवले असून तेथे बसण्यास मनाई केली आहे. असे असतानाही आंदोलन सुरू ठेवणे हा न्यायालयाचा अवमान असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील वनजमिनींचे हक्क देण्याबाबतही त्यांनी माहिती दिली. पुढील ३ महिन्यांत सर्वांना ७/१२ उतारे दिले जावे आणि स्थानिकांना रोजगार मिळावा, हे सरकारचे उद्दिष्ट आहे. ५० वर्षांचा संघर्ष पूर्ण होत असून पुनर्वसनाच्या कामांबाबतचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून, पालघरला राज्यातील पहिल्या ५ जिल्ह्यांमध्ये आणण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच, दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारतर्फे मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, अशी कोणतीही आघाडी खऱ्या अर्थाने अस्तित्वात नाही. राज्यात हे पक्ष एकमेकांविरोधात लढतात, मात्र केवळ नरेंद्र मोदींच्या भीतीमुळे दिल्लीत एकत्र येतात. त्यांच्यात कसलीही एकता नसून मोदींना कसे हटवायचे, यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

पेपरफुटी झाली तेव्हा भीमनराव अध्यक्ष म्हणून रुजूही झाले नव्हते, त्यामुळे मागील घटनेसाठी त्यांचा राजीनामा कसा घेणार असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच अध्यक्षांचा राजीनामा घेण्याचा अधिकार राज्य सरकारला नसून केवळ राष्ट्रपतींना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही