मुंबई, 8 ऑक्टोबर: दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले. रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या (Nana Patekar) निधनानंतर ८ ऑक्टोबर २०२६ रोजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे यांनी समाजमाध्यमांवरून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
मृत्यूसमयी नाना पाटेकर त्यांच्या गोव्यातील घरात पुतण्या प्रसाद पाटेकर यांच्यासोबत होते. रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना बेशुद्धावस्थेत गोव्यातील मणिपाल रुग्णालयात नेण्यात आले. येथील डॉक्टरांनी त्यांना ४५ मिनिटे सीपीआर देऊन वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नाना पाटेकर यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना सचिन तेंडुलकरने समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली. नाना हे एक जमिनीशी जोडलेले आणि प्रामाणिक व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या मराठी आणि हिंदी भूमिकांमध्ये सर्वस्व अर्पण केले, अशी भावना सचिनने व्यक्त केली. तसेच, अजिंक्य रहाणेनेही आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, नाना पाटेकर हे एक उत्कृष्ट अभिनेते होते आणि त्यांच्या कामाने अनेक पिढ्यांना प्रेरणा देत त्यांचे मनोरंजन केले.
नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या पुण्यातील डोणजे येथील फार्म हाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन; ‘नटसम्राट’बाबतची ती भीती ठरली खरी
- शिवसेनेची २०१८ ची घटना निवडणूक आयोगाकडे नाही; ठाकरेंना झटका बसणार?
- पंतप्रधान मोदी, अमित शाहांना सद्बुद्धी मिळण्यासाठी इंडिया आघाडी राजघाटावर आंदोलन करणार: मल्लिकार्जुन खर्गे
Quick Answers
नाना पाटेकर यांचे गोव्यात वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.
नाना पाटेकर यांना रात्री अचानक छातीत दुखू लागल्याने गोव्यातील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी ४५ मिनिटे सीपीआर दिल्यानंतर पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले.
सचिन तेंडुलकर यांनी भावना व्यक्त केली की, नाना हे एक जमिनीशी जोडलेले आणि प्रामाणिक व्यक्ती होते, ज्यांनी आपल्या मराठी आणि हिंदी भूमिकांमध्ये सर्वस्व अर्पण केले.
नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यातील डोणजे येथील फार्म हाऊसवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.







